YIN Goa: ‘गोमन्तक यीन’ पुस्तक परीक्षण स्पर्धेत स्वराली प्रथम

गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित अखिल गोवा महाविद्यालयीन मराठी पुस्तक परीक्षण स्पर्धा
From Left Side Swarali tengse, Rasika joshi, Anamika sawant Winner Marathi Book Review Competition
From Left Side Swarali tengse, Rasika joshi, Anamika sawant Winner Marathi Book Review Competition Dainik Gomantak

Goamantak YIN Marathi Book Review Competition: गोमन्तक यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे आयोजित करण्यात आलेल्या अखिल गोवा महाविद्यालयीन मराठी पुस्तक परीक्षण स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला.

ही स्पर्धा ''कविता'' या साहित्य प्रकारापुरती मर्यादित होती. विद्यार्थ्यांमध्ये पुस्तक वाचनाची आवड निर्माण व्हावी या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यास विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

From Left Side Swarali tengse, Rasika joshi, Anamika sawant Winner Marathi Book Review Competition
Neena Gupta Video: 'झाले बाबा एकदाची VIP' अभिनेत्री नीना गुप्ता यांनी गोवा आणि मोपाचे आभार का मानले?

या स्पर्धेचे प्रथम पारितोषिक सरकारी महाविद्यालय कला, विज्ञान आणि वाणिज्य, केपे येथे शिकणारी स्वराली टेंगसे हिला प्राप्त झाले.

दुसरे पारितोषिक धेंपे महाविद्यालय कला आणि विज्ञान, मिरामार येथे शिकणारी रसिका जोशी हिला प्राप्त झाले आहे.

तिसरे बक्षिस अनामिका सावंत (सी. ई. एस्. महाविद्यालय कला आणि वाणिज्य, कुंकळ्ळी) हिला मिळालेले आहे. सर्व विजयी स्पर्धकांना ''गोमन्तक यिन''तर्फे प्रशस्तिपत्रके व बक्षीसे देण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या पुस्तक वाचनाच्या आवडीबद्दल परिक्षकांनी आनंद व्यक्त केला. तसेच ही आवड मुलांमध्ये रुजविण्यासाठी अशा तऱ्हेच्या स्पर्धा वरचेवर आयोजित करण्यात यावे, असे मत परिक्षकांनी व्यक्त केले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com