Vijai Sardesai: विजय सरदेसाई 'गाेंयचो राखणदार', युकेतील गोमंतकीयांनी दिली पदवी

Vijai Sardesai: गोव्‍यातील संस्‍कृती आणि सांस्‍कृतिक मुल्‍यांचे रक्षण करण्‍यासाठी सरदेसाई यांनी कार्य केले आहे, यासाठी त्‍यांना ही पदवी बहाल करण्‍यात आली.
Vijai Sardesai In UK
Vijai Sardesai In UKDainik Gomantak

Vijai Sardesai facitated as Goencho Rakhandar in United Kingdom

गोव्‍यातील संस्‍कृती आणि अनोखी ओळख युनायटेड किंगडम (युके) येथेही राखून ठेवलेल्‍या गोेमंतकीयांनी युकेमध्‍ये आयोजीत केलेल्‍या इस्‍टर बॉल सोहळ्‍यात गोवा फॉरवर्डचे अध्‍यक्ष विजय सरदेसाई यांना ‘गोंयचो राखणदार’ हा पुरस्‍कार देऊन सन्‍मानीत केले.

गोव्‍यातील संस्‍कृती आणि सांस्‍कृतिक मुल्‍यांचे रक्षण करण्‍यासाठी सरदेसाई यांनी कार्य केले आहे, यासाठी त्‍यांना ही पदवी बहाल करण्‍यात आली.

या मेळाव्यात बाेलताना सरदेसाई यांनी, इस्टरच्या भावनेशी निगडीत अशा आणि एकतेचा संदेश दिला. ‘गोंयकारपण’ म्‍हणजेच फक्‍त गोमंतकीय ओळख नसून मानवतेमध्‍ये रुजलेल्‍या मुल्‍यांचे रक्षण करण्‍यासाठी केलेला प्रयत्‍न असण्‍याची गरज व्‍यक्‍त केली. या मुल्‍यांमुळेच गोव्‍याची अनोखी अशी ओळख जगभरात बनली आहे, असे ते म्‍हणाले.

गोव्यासमोरील आव्हाने अधोरेखित करताना सरदेसाई यांनी राज्याच्या सांस्कृतिक जडणघडणीला आणि इतिहासाचे पुनर्लेखन करण्याचा धोका असल्‍याचे नमूद करत यासाठी होत असलेल्‍या बाह्य प्रभावांकडे लक्ष वेधले.

Vijai Sardesai In UK
Delhi Excise Scam: गोवा निवडणुकीत 45 कोटींचा वापर; ईडीच्या दाव्याला आता CBI, IT ची पुष्टी

गोव्यातील विकासाचा पुरस्कार करत त्यांनी ‘गोवन्स विदाऊट बॉर्डर्स’ चळवळीचे महत्त्व अधोरेखित केले, जे गोव्याला केंद्रस्थानी ठेवते असे ते म्‍हणाले. यासाठी विदेशस्‍थ गोमंतकीय महत्‍वाची भूमिका निभावू शकतात असे त्‍यांनी सांगितले.

आपल्‍याला दिलेल्‍या पदवीबद्दल युकेतील गोमंतकीयांचे आभार मानताना सरदेसाई यांनी, गोव्‍यातील राजकीय गोंधळ दूर व्‍हावा आणि राज्‍याची अखंडता कायम रहावी यासाठी मी काम केले. आणि ते काम यापुढेही चालू राहील असे वचन सरदेसाई यांनी दिले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com