Vat Purnima 2024: वटपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला मुसळधार; सत्तरीत झाडांची पडझड

Vat Purnima 2024: रस्त्यांवर पाणी; होंडा येथे ट्रक, कारचे नुकसान
Vat Purnima 2024
Vat Purnima 2024Dainik Gomantak
Published on
Updated on

Vat Purnima 2024

महिला वर्गाची वटपौर्णिमा साजरी होणार असून गुरुवारी (ता.२०) सत्तरी तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. त्यामुळे सत्तरी तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर पाणी होते.

धारखंड-धावे रस्त्यावर एका वळणावर मोठ्या प्रमाणावर पावसाचे पाणी तुंबले होते. त्यामुळे दुचाकीस्वारांना बरीच कसरत करावी लागली. म्हादई नदी व त्याला लागूनच असलेल्या उपनद्यांना प्रचंड प्रमाणात पाणी आले होते. त्यामुळे साट्रे, देरोडे गावातील म्हादईच्या उपनद्या दुथडी भरून वाहत होत्या. जोरदार पावसामुळे चारचाकी वाहनांनादेखील समोरील रस्ता व्यवस्थित दिसत नव्हता. परिणामी वाहनांच्या पार्किंग लाईट सुरू ठेवून वाहन चालविण्याची वेळ आली.

Vat Purnima 2024
Goa Fraud Case: बनावट दाखले तयार करुन जमीन विक्री, 2.20 कोटींच्या फसवणुकीचा आरोप; संयिताला जामीन नाकारला

होंडा ते वाळपई मुख्य रस्त्यावर होंडा येथे जानकी बारसमोर आंब्याचे झाड रस्त्यावरील ट्रक आणि चारचाकी वाहनावर पडल्याने वाहनांचे मोठे नुकसान झाले. यावेळी दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. सुमारे अर्ध्या तासाच्यावर वाहतूक कोंडी झाली. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. त्यानंतर वाळपई अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी जाऊन भर पावसातच मदतकार्य करत रस्ता वाहतुकीस सुरळीत केला. यावेळी वाहनांचे किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही.

वीजतारांचे नुकसान

सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांची पडझड सुरूच होती. सकाळी चरावणे मार्गावर आंब्याचे झाड रस्त्यावर पडले, दुपारी घोलमळ-मैंगीणे-सत्तरी येथे रस्त्यावर व वीजतारांवर रानटी झाड पडून नुकसान झाले.

त्यानंतर सय्यद नगर-वाळपई येथे झाड घरावर व घराच्या कुंपणावर पडून उस्मान खतरी यांचे अंदाजे पन्नास हजारांचे नुकसान झाले तर ६० हजारांची मालमत्ता वाळपई अग्निशमन दलाला वाचविण्यास यश आले. तसेच सायंकाळी पाली-सत्तरी येथे रस्त्यावर व वीजतारांवर काजूचे झाड पडून वीजतारांचे नुकसान झाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com