Goa : पर्यावरणपूरक औद्योगिक प्रकल्पाची प्रतीक्षा

कृषी व्यवसायास भरपूर वाव; हवीय फक्त राजकर्त्यांची इच्छाशक्ती (Goa)
Goa : Khorjuvem Historical Fort.
Goa : Khorjuvem Historical Fort.Dainik Goamantak

म्हापसा : वाढत्या उद्योगीकरणाने हळदोणे विधानसभा (Aldona Constituencey) मतदारसंघाला अद्याप फारसे ग्रासलेले नाही. काही तुरळक अपवाद वगळता या मतदारसंघांतील जवळजवळ सर्वच गावांनी स्वत:ची निसर्गसंपन्नता अबाधित ठेवण्यात यश मिळवले आहे. ऐतिहासिक वास्तूंच्या (Historical Building) खाणाखुणांचे अस्तित्वही बव्हंशी राखून ठेवण्यात आले आहे. तथापि, या मतदारसंघातील लोक प्रतीक्षा करीत आहेत, ती पर्यावरणपूरक औद्योगिक प्रकल्पाची (Eco Environmental Industry).

Goa : Khorjuvem Historical Fort.
Goa: चोर्ला घाटात अखेर बारा तासानंतर वाहतूक सुरळीत

या मतदारसंघात हळदोणे - खोर्जुवे, नास्नोडा, मयडे, बस्तोडा, उसकई - पालये - पुनोळा व पोंबुर्पा - वळावली अशा सहा पंचायत क्षेत्रांचा अंतर्भाव आहे. त्यापैकी हळदोणे ही सर्वाधिक लोकसंख्या असलेली मोठी पंचायत आहे. आजच्या घडीस या सहाही पंचायत क्षेत्रांत भापज पुरस्कृत पंचायत सदस्यांचे गट सत्तास्थानी आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील राजकारण एकतर्फी असल्याचा प्रत्यय येतो. काँग्रेस, म.गो., आप, गोवा फॉरवर्ड अशा विविध राजकीय पक्षांत सर्व विरोधक विभागलेले असल्याने मतदारसंघातील विविध समस्यांचा शासकीय दरबारी पाठपुरावा करण्याच्या बाबतीत त्यांच्यामध्ये एकी नाही. त्याचा लाभ अप्रत्यक्षपणे येथील भाजपचे विद्यमान आमदार ग्लेन टिकलो यांना होत आहे, असे स्पष्टपणे जाणवते. या मतदारसंघातील सुमारे नव्वद टक्के पंचायतसदस्य भाजपचे कार्यकर्ते अथवा हितचिंतक असल्याने विकासकामांच्या तसेच समस्यांच्या बाबतीत विरोधकांचा आवाज अभावानेच ऐकायला मिळतो.

‍मूलभूत सुविधांचा अभाव
वीजपुरवठा वेळोवेळी खंडित होणे व वीज प्रवाहाच्या दाबात चढ-उतार होणे, मतदारसंघातील बहुतांश भागांत अपुरा, तसेच अविश्वासार्ह पाणीपुरवठा इत्यादी प्रश्न या मतदारसंघात नेहमीचेच झाले आहेत. मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती दयनीय झालेली आहे. हळदोणे येथील सातेरी भगवती मंदिराजवळचा रस्त्याचे थोडेफार रुंदीकरण करण्यात आले; तथापि, त्या कामातही टापटीपणा नाही. तेथील फूटपाथच्या बाजूला झुडपे वाढलेली असल्याने तसेच सध्या तिथे शेवाळ निर्माण झाल्याने पादचाऱ्यांना नाईलाजाने मुख्य रस्त्यावरूनच चालत जावे लागते, अशी स्थानिकांची कैफियत आहे. त्या पूटपाथची दुरुस्ती व देखभाल करणे सध्या आवश्यक ठरलेले आहे.

Goa : Khorjuvem Historical Fort.
Goa:कोसळधार पर्जन्यवृष्टीमुळे डिचोलीत हाहाकार

रस्‍ता समस्‍या
पोंबुर्पा-वळावली येथेही रस्त्याचे रुंदीकरण केले आहे; तथापि, त्या कामाचा किमान दर्जा राखण्याबाबत शासकीय अधिकाऱ्यांचा बेशिस्तपणा दिसून येतो. सध्या तिथे रस्त्याच्या बाजूंना गवत आणि झाडे-झुडपे वाढलेली असून आमदारही त्याबाबत पाठपुरावा करीत नसल्याने ती समस्या कायम राहिली आहे. म्हापसा शहरातील आकय व कामरखाजन हे भाग हळदोणे मतदारसंघात अंतर्भूत आहेत. तेथीलही रस्ते निकामी झाले आहेत.

कृषीला प्रोत्‍साहन हवे
या मतदारसंघात कृषी व्यवसायाला चालना देण्यास भरपूर वाव आहे. परंतु, त्यासाठी राजकर्त्यांची इच्छाशक्तीच हवी आहे. तिराळीच्या कालव्याचे पाणी शेतीपर्यंत जावे यासाठी जलसिंचन खात्यातर्फे बस्तोडा गावात घातलेल्या पाइपलाइनचे काम ९९ टक्के पूर्ण झाले आहे. तथापि ही पाइपलाइन या मतदारसंघातील नास्नोडा, मयडे, हळदोणे अशा अन्य गावांपर्यंत सर्वत्र नेण्याचीही गरज आहे. तेव्हाच तेथील कृषी व्यवसायाला चालना मिळणार आहे. दीर्घ काळ ताटकळत असलेल्या त्या योजनेच्या माध्यमातून शेतीसाठी कधी पाणी उपलब्ध होईल, याबाबत मतदारसंघातील शेतकरी प्रतीक्षेत आहेत.

आश्‍‍वासन पूर्ती झालीच नाही!
हळदोणे येथील शेतातून बगलमार्ग उभारण्याचे आश्वासन विद्यमान आमदाराने दिले होते. त्या आश्वासनाच्या पूर्तीची प्रतीक्षा सध्या तेथील लोक करीत आहेत. हळदोणे येथे सुसज्ज बसस्थानक उभारण्याचे आश्वासनही राजकर्त्यांनी दिले होते. तथापि, तेही आश्वासन सध्या हवेतच विरले आहे.

Goa : Khorjuvem Historical Fort.
Goa: अंजुणे धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात; चारही दरवाजे खुले

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com