Rise In Vegetable Price: राज्यात महागाईने सर्वसामान्यांचे खिसे रिकामे; भाजीपाल्याच्या दरामध्ये मोठी वाढ

लांबलेल्या मॉन्सूनचा परिणाम : टोमॅटो 80 रुपये किलो; कोथिंबीर 60रुपये जुडी
Goa Vegetable Rate
Goa Vegetable RateDainik Gomantak

Panaji : लांबलेल्या पावसाचा परिणाम भाजीपाला उत्पादनावर होऊ लागला आहे. त्यामुळे शेजारील राज्यात म्हणजे कर्नाटक आणि महाराष्ट्रातून येणाऱ्या भाजीपाल्यांच्या दरामध्ये वाढ होऊ लागली आहे. टॉमेटो ८० रुपये प्रतिकिलो दराने विकले जात आहेत. आलेदेखील ३०० रुपये किलो तर हिरवी मिरची १२० रुपये किलो दराने विकली जात आहे.

शेजारील राज्यातून येणाऱ्या कोथिंबिरीची आवक रोडावली आहे. आवक रोडावल्याने त्याचा परिणाम दरावर झाल्याचे दिसून येत आहे. काही विक्रेत्यांकडेच कोथिंबीर उपलब्ध होत असल्याने ६० रुपयांना एक जुडी ग्राहकांना खरेदी करावी लागत आहे. शेजारील राज्यातही मॉन्सूनचा परिणाम झाला आहे. मॉन्सून लांबल्याने त्याचा परिणाम भाजीपाला व फळभाज्यांवर झालेला आहे.

Goa Vegetable Rate
Hasan Khan Murder Case: मोठी बातमी! ताळगाव हसन खान खून प्रकरणी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

राज्यात दिवसेंदिवस जीवनावश्‍यक वस्तूंचे दर वाढत असून महागाईने सर्वसामान्य तसेच मध्यमवर्गीय नागरिकांचे खिसे रिकामे केले आहेत. भाजीपाल्याच्या दरांमध्येदेखील वाढ झालेली पाहायला मिळते. कांदा, बटाटा दर गेल्या महिन्यापासून स्थिर आहेत. परंतु हिरवी मिरची, टॉमेटो, फळभाजांच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मॉन्सून मंदावल्याने पिकात घट होऊन भाजीपाल्याचे दर वाढण्याची शक्यता असल्याचे घाऊक विक्रेते सांगतात.

दर प्रतिकिलो

  • कांदा 30

  • बटाटा 40

  • टोमॅटो 70

  • कारली 80

  • भेंडी 60

  • बिन्स 160

  • कोबी 40

  • फूल कोबी 40

  • आले 300

Goa Vegetable Rate
Hasan Khan Murder Case: मोठी बातमी! ताळगाव हसन खान खून प्रकरणी उच्च न्यायालयाचा महत्वाचा निकाल

पालेभाजी प्रतिजुडी

  • मेथी 20

  • लालभाजी 20

  • कांदापात 20

  • पालक10

  • शेपू 10

  • कोथिंबीर 50-60

  • पुदिना 20

  • लिंबू 5 रुपये 1

Goa Vegetable Rate
World MSME Day: दिव्यांगांना समान रोजगार संधी द्या- हाजिक

फलोत्पादन महामंडळातील भाजीचे दर

(प्रतिकिलो)

  • भेंडी 26

  • कोबी 19

  • गाजर 35

  • मिरची 78

  • कांदे 21

  • बटाटा 25

  • टोमॅटो 52

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com