Vasco News: वास्कोत आयओसीपूल 'या' कारणास्तव 6 तासांसाठी राहणार बंद

Vasco News: मुरगाव व देस्तेरो - बायणा भागातील वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
Vasco News
Vasco NewsDainik Gomantak

Vasco News: वास्कोतून मुरगावला जोडणारा महत्त्वाचा 366 मार्गावरील आयओसी पूल, राष्ट्रीय महामार्गाला मुरगाव बंदराशी जोडणारा केबल ब्रीज कामासाठी रात्रीच्या वेळी सहा तास सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती दक्षिण गोवा फातोर्डा सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी कळविले आहे.

रविवार,17 मार्च ते 1 एप्रिल 2024 पर्यंत रात्री 12 ते पहाटे 6 पर्यंत आयओसी पूल सर्व वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

परंतु रात्रीची 12 ते पहाटे 6 पर्यंत वाहतूक अन्य कोणत्या मार्गाने वळविण्यात येणार आहे, याविषयी मात्र संबंधित विभागाने माहिती जाहीर केलेली नसल्याने मुरगाव व देस्तेरो - बायणा भागातील वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Vasco News
Goa Theft Case: दाबोळी येथे दिवसाढवळ्या चोरी; 4 मोबाईल, DSRL कॅमेऱ्यासह लाखोंचा ऐवज लंपास

यामुळे येथील वाहतुकीवर काहीसा परिणाम जाणवणार असल्याचे येथील स्थानिकांनी सांगितले. दरम्यान स्मार्ट सिटीच्या कामानिमित्त जुने गोवे ते रायबंदर रस्ता 30 एप्रिलपर्यंत बंद राहणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कदंब पठारावरील हमरस्त्यामार्गे वळविण्यात आल्याने या मार्गावरील वाहतुकीचा ताण वाढला आहे.

10 मार्च रोजी स्मार्ट सिटीच्या अंतिम टप्प्याचे काम सुरू केले. हे काम पूर्ण करण्यासाठी 31 मे अखेरची मुदत असल्याने 30 एप्रिलपर्यंत जुने गोवे ते दिवजा सर्कलपर्यंतचा रस्ता बंद केला आहे.

त्यामुळे कदंब पठारावरील मार्गावर वाहनांची गर्दी होऊन चिंबल नाक्यावर वाहतूक कोंडी होते. सकाळी 7 ते 11आणि सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com