Inter University Football: आंतरविद्यापीठ फुटबॉल स्पर्धेत गोवा विद्यापीठाच्या मुलींना उपविजेतेपद

अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्रता
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेला गोवा विद्यापीठाचा संघ.
पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेला गोवा विद्यापीठाचा संघ.Dainik Gomantak

Inter University Football: ग्वाल्हेर येथे झालेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत गोवा विद्यापीठाला उपविजेतेपद मिळाले, तर अखिल भारतीय आंतरविद्यापीठ स्पर्धेच्या पात्रता प्ले-ऑफ लढतीत कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठावर चुरशीच्या लढतीत पेनल्टी शूटआऊटवर (3-2) मात केली.

प्ले-ऑफ लढतीत निर्धारित वेळेस गोलफरक 1-1असा गोलबरोबरीत राहिला. कॅरेन एस्ट्रोसियो हिने गोवा विद्यापीठास उत्तरार्धाच्या सुरवातीस आघाडी मिळवून दिली. सामन्यातील तीन मिनिटे बाकी असताना शिवाजी विद्यापीठाने बरोबरीचा गोल केला.

पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ महिला फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपद मिळविलेला गोवा विद्यापीठाचा संघ.
Goa Corona Updates: गोव्यात कोरोनाच्या नवीन व्हेरियंटच्या रूग्णांमध्ये मोठी वाढ; 'इतके' नवे रूग्ण आढळले...

पेनल्टी शूटआऊटमध्ये गोव्याची गोलरक्षक ज्योसेन मास्कारेन्हास हिची कामगिरी लाजबाव ठरली. तिने तीन स्पॉट किक्स अडवून गोवा विद्यापीठास अखिल भारतीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवून दिली.

त्यापूर्वी, पश्चिम विभागीय स्पर्धेच्या साखळी फेरीत गोवा विद्यापीठाने पहिल्या लढतीत मुंबई विद्यापीठास 1-1असे गोलबरोबरीत रोखले. ॲनिएला बार्रेटो हिने एकमेव गोल केला. नंतर गोव्याच्या महिलांनी राजस्थानच्या कोटा विद्यापीठावर 1-0 फरकाने मात केली.

पुष्पा परब, कॅरेन एस्ट्रोसियो व आरोषी गोवेकर यांनी प्रत्येकी एक गोल केला. अखेरच्या साखळी लढतीत गोवा विद्यापीठास ग्वाल्हेरच्या एलएनआयपीई संघाविरुद्ध 2-2 गोलबरोबरीवर समाधान मानावे लागले. दोन्ही गोल पुष्पा परब हिने नोंदविले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com