Goa Tourism : युरोपीयन प्रवाशांना होणार गोव्याचे दर्शन

लंडनच्या ‘वर्ल्ड टुरिझम मार्ट’मध्ये सहभाग
Team from Goa participating in World Travel Mart in London.
Team from Goa participating in World Travel Mart in London.Dainik Gomantak

Goa Tourism : पणजी, गोवा पर्यटन सोमवार, ६ ते बुधवार, ८ रोजीपर्यंत चालणाऱ्या लंडनमधील वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होणार आहे. किनारपट्टी आणि समुद्रकिनारा संस्कृतीसाठी ओळखले जाणारे गोवा हे विश्रांती, साहसी प्रवास यांचे एक अनोखे मिश्रण आहे.

सांस्कृतिक अनुभव, इको टुरिझम, हिंटरलँड टुरिझम, हेरिटेज टुरिझम, स्पोर्ट्‌स टुरिझम, फेस्टिव्हल टुरिझम, क्युझिन आणि कल्चरल टुरिझम यासारख्या लोकप्रियता मिळवणाऱ्या पर्यटनस्थळांच्या पैलूंवर प्रकाश टाकणे आणि गोव्याला वर्षभर पर्यटनस्थळ म्हणून दाखवणे हे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्टमध्ये सहभागी होण्याचे उद्दिष्ट आहे.

संपूर्ण यूके आणि युरोपमधील पर्यटकांना उत्सव, वर्षअखेरीचे उपक्रम, वारसा आणि वास्तुकला, साहसी उपक्रम आणि स्पा सेवांचा अनुभव घेण्यासाठी गोव्याला भेट

द्यायला आवडेल.

गोव्याच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे प्रदर्शन करणे आणि आपल्या पर्यावरणाचा आदर आणि संरक्षण करणाऱ्या जबाबदार पर्यटनाला प्रोत्साहन देणे हे आमचे ध्येय आहे.

वर्ल्ड ट्रॅव्हल मार्ट लंडनमधील गोव्याचा सहभाग जागतिक नकाशावर गोव्याला एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून स्थान देण्याबाबत आमची वचनबद्धता दर्शवितो.

- रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com