Today's Goa News Live: गोव्यात दिवसभर घडलेल्या ठळक घडामोडींचा आढावा

Goa Latest News in Marathi Live (05 March 2024): राज्यात राजकारण, गुन्हे, पर्यटन, कृषि, क्रीडासह विविध क्षेत्रात घडणाऱ्या घटनांचा आढावा.
Goa Batmya Live News (05 March 2024) | Latest Update on Pramod Sawant, Anjuna Beach, Panaji and Overall Maharashtra
Goa Batmya Live News (05 March 2024) | Latest Update on Pramod Sawant, Anjuna Beach, Panaji and Overall MaharashtraDainik Gomantak

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत प्रत्येक शाळेत संस्कृत शिक्षक नेमले जाणार

New Education Policy | Konkani Language

नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत प्रत्येक शाळेत संस्कृत शिक्षक नेमले जाणार. मुलांनी इंग्रजीसोबतच कोकणीचे ज्ञान घेणे गरजेचे आहे तसेच कोकणी भाषेच्या विस्तारासाठी तरूणांची खुप आवश्यकता आहे.

हल्लीच झालेल्या नोकर भरती आयोगाच्या कोंकणी परिक्षेत ९०० पैकी फक्त सांगितले८९३ मुले पास झाली ही कौतुकास्पद गोष्ट असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कोंकणी भाषा संचालनालयाच्या कार्यक्रमावेळी बोलताना सांगितले.

काँग्रेसने तिकीट नाकारल्यास श्रीपाद भाऊंना मत देणार - खलप

काँग्रेसने तिकीट नाकारल्यास मित्र श्रीपाद नाईक यांना मत देणार. गेल्या पन्नास वर्षांचा राजकीय अनुभव सुखदायी आहे. श्रीपाद नाईक यांच्याविरुद्ध उत्तर गोव्यातून लढत झाल्यास ती निश्चितच अटीतटीची असेल. - रमाकांत खलप

रगाडा नदीचे पाणी पिण्यास अयोग्य, अभियंत्यावर कारवाई करा

Ragada River pollution

पिण्यासाठी शुद्ध पाण्याचा पुरवठा करा. रगाडा नदीचे पाणी पिण्यासाठी अयोग्य असुनही ते पिण्यासाठी योग्य असल्याचे म्हणणाऱ्या साबांखाच्या अभियंत्यावर त्वरित कारवाई करा, साकोर्डाच्या नागरिकांची मागणी.

धारगळ राष्ट्रीय महामार्गावर 'हिट अँड रन', युवक जागीच ठार!

धारगळ येथे राष्ट्रीय महामार्गावर दुचाकीला धडक. धडक देऊन चालकाचे पलायन‌. दुचाकीस्वार संजय जळवी (सिंधुदुर्ग) जागीच ठार.

हणजूणे विकास निषिद्ध क्षेत्रातील बेकायदा 114 आस्थापनाना ठोकले टाळे 

Anjuna Illegal Constructions

हणजूणे पंचायतीच्या किनारपट्टीवरील विकास निषिद्ध क्षेत्रातील १७५ बेकायदा आस्थापनांपैकी ११४ आस्थापनाना टाळे ठोकल्याची पंचायतीतर्फे माहिती, सविस्तर कृती अहवालाचे प्रतिज्ञापत्र उद्यापर्यंत सादर करण्याचा पंचायत सचिवाला खंडपीठाचा निर्देश. पंचायतीच्या कार्यपद्धतीबाबत खंडपीठाची नाराजी.

सुनीता सावंत दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षकपदी

दक्षिण गोवा पोलीस उपअधीक्षकपदी सुनीता सावंत यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्याकडे कायदा व दक्षता तसेच आर्थिक गुन्हे विभागाचा अतिरिक्त ताबा देण्यात आला आहे

साल्वादोर दी मुंद येथे अवैध क्रिकेट सट्टा; प. बंगालच्या तिघांना अटक

पर्वरी पोलिसांकडून साल्वादोर दी मुंद येथे एका बंगल्यावर छापा टाकून अवैध क्रिकेट सट्टा चालवणाऱ्या 3 जणांना अटक. संशयित पश्चिम बंगालमधील असून त्यांच्याकडून पोलिसांनी एक लाख 70 हजार किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोव्याच्या महिला अजिंक्य

34व्या राष्ट्रीय सीनियर टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत गोव्याच्या महिलांनी अजिंक्यपद पटकावताना अंतिम लढतीत छत्तीसगढला 41 धावांनी हरविले. स्पर्धा तमिळनाडूतील रामनाथपुरम येथे झाली.

उपनगराध्यक्ष पदासाठी सुशांत हरमलकर यांचा एकमेव अर्ज

म्हापसा नगरपालिकेच्या रिक्त असलेल्या उपनगराध्यक्ष पदासाठी सत्ताधारी गटातून सुशांत हरमलकर यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल. उद्या बुधवारी (ता.6) होणाऱ्या निवडणुकीत बिनविरोध लागणार वर्णी.

सारमानस-पिळगाव नदीकाठच्या वाटेवर उभारली जाणार संरक्षक भिंत

सारमानस-पिळगाव नदीकाठची पारंपरिक वाट होणार सुरक्षित. 90 लाख रुपये खर्चून रस्त्यासह नदीकाठी उभारली जाणार संरक्षक भिंत. आमदार प्रेमेंद्र शेट यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह गोव्यात दाखल

Rajnath Singh In Goa

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांचे दाबोळी विमानतळावर दाखल. राजशिष्टाचार मंत्री माविन गुदिन्हो यांनी पुष्पगुच्छ देऊन केले स्वागत. राजनाथ सिंह वेरे येथील नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नवीन प्रशासकीय आणि प्रशिक्षण इमारतीचे उद्घाटन करतील.

कोलवाळ तुरुंगातील कैद्यांचा छळ? तुरुंग अधिकाऱ्यांविरोधात निषेध

Colvale Jail

कोलवाळ तुरुंगातील कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्यांकडून कथितपणे छळ होत असल्याच्या विरोधात निषेध व्यक्त केला आहे.

तुरुंग अधिकारी अवेळी त्यांच्या सेल / बॅरेकवर छापे टाकतात आणि कैद्यांवर लाठीमार करतात, असा आरोप त्यांनी केला आहे. याप्रकरणी तुरुंग अधिका-यांविरुद्ध तक्रार दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

मांगोर हिल येथील सेंट तेरेझा विद्यालयात चोरी

Burglary at St Theresa School, Mangor

मांगोर हिल येथील सेंट तेरेझा विद्यालयात चोरी झाल्याचे उघड झाले आहे. विद्यालयातून 01 लाख रुपयांची रोख रक्कम व 39 हजारांच्या 04 डीव्हीआरची चोरी झाल्याची माहिती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com