Goa Today News: श्रेया धारगळकरला आज दिलासा नाहीच!

Goa Today's 23 May 2024 Breaking News: गोव्यात विविध क्षेत्रात घडणाऱ्या ठळक घडामोडींचा आढावा.
Court
CourtDainik Gomantak

श्रेया धारगळकरला आज दिलासा नाही!

डिचोली प्रथम श्रेणी न्यायालयात श्रेया धारगळकरने सादर केलेल्या जामीन अर्जावर डिचोली पोलिसांची हरकत याचिका न्यायालयाने स्वीकारली. जामीनावर उद्या (शुक्रवारी दि. 24 मे रोजी) सुनावणी होणार आहे.

‘खंडणीखोर एनजीओवर कारवाई होणार, धारगळकरचा मी निषेध करतो’: CM सावंत

देव देवतांबाबत वक्तव्य करणाऱ्या श्रेया धारगरळकरचा मी निषेध करतो, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले. त्याचबरोबर एनजीओच्या नावाखाली खंडणी वसूल करणे बंद होणार असल्याचेही म्हणाले. शिवाय, यासंबंधी कोणी तक्रार केल्यास तात्काळ कारवाई करु असे देखील ते म्हणाले.

 CM Pramod Sawant
CM Pramod SawantDainik Gomantak

अवकाळी पावसाचा गावठी मिरची पिकाला मोठा फटका!

राज्यात मागील काही दिवसांपासून अवकाळी पाऊस पडत आहे. या अवकाळी पावसाचा गावठी मिरची पिकाला मोठा फटका बसला आहे. यंदा पीक समाधानकारक असताना अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे.

Chili
ChiliDainik Gomantak

उत्तर गोवा इंटेलिजन्सची IPL सट्टेबाजी प्रकरणी मोठी कारवाई, 22 जणांना अटक

पर्वरी येथे उत्तर गोवा इंटेलिजन्सने केलेल्या छापेमारीत आयपीएल ऑनलाइन सट्टेबाजीचा पर्दाफाश केला. यादरम्यान 22 जणांना अटक करण्यात आली. त्याचबरोबर 10 लॅपटॉप, 40 मोबाईल आणि एक लाखांची रोकड असा एकूण 10 लाख किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

IPL Online Betting
IPL Online BettingDainik Gomantak

सरकारने संपूर्ण रोजगार क्षेत्राची श्वेतपत्रिका काढावी, सरदेसाईंची मागणी

सरकारने संपूर्ण रोजगार क्षेत्राची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते विजय सरदेसाई यांनी केली आहे. खाजगी क्षेत्रावर सरकारचे नियंत्रण नाही. दिवसेंदिवस बाहेरील लोकांची संख्या वाढत आहे, असेही ते म्हणाले.

Vijai Sardesai
Vijai Sardesai Dainik Gomantak

Goa Accident: वेर्णा बायपास येथे टेम्पोची कदंब बसला धडक; चालक जखमी

वेर्णा बायपास येथे टोमॅटो घेऊन जाणाऱ्या टेम्पोने ओव्हरटेक करत असताना कदंब बसला धडक दिली, ज्यामध्ये चालक जखमी झाला.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

चिंबल जंक्शनवरील उड्डाणपूलाची एक लेन जूनमध्ये!

चिंबल जंक्शनवरील उड्डाणपुलाची एक लेन जूनच्या मध्यावधीत खुली वाहतुकीसाठी होणार. कामाची पाहणी केल्यानंतर आमदार रुडॉल्फ फर्नांडीस यांनी माहिती दिली.

MLA Rodolfo Fernandes
MLA Rodolfo FernandesDainik Gomantak

माशेल येथे दुचाकी आणि चारचाकीचा अपघात

Goa Accident

माशेलात चारचाकीची दुचाकीला धडक बसून दोन्ही वाहने कोसळली ओहोळात. चारचाकी चालक व आतील कामगार सुखरूप, दुचाकी स्वारही दुकानात गेल्याने बचावला. मात्र एक पादचारी गंभीर जखमी.

Goa Accident
Goa AccidentDainik Gomantak

गोव्यातील आणखी एका कंपनीसाठी महाराष्ट्रात मुलाखती

इनडोको या फार्मा कंपनीसाठी मुंबईत होत असलेल्या मुलाखती मोठ्या विरोधानंतर रद्द करण्यात आल्या असताना आता गोव्यातील आणखी एका फार्मा कंपनीसाठी महाराष्ट्रातील पुणे येथे मुलाखती आयोजित केल्याचा प्रकार आमदार विजय सरदेसाई यांनी उघडकीस आणला आहे.

कुडतरीतील तळ्‍यात एकाचा बुडून मृत्‍यू

उकाडा असह्य झाल्‍याने खोर्जे-कुडतरी येथे तळ्यात पोहायला गेला असता कामिल परेरा (47) याचा बुडून मृत्यू झाला. परेरा बुडाल्याची खबर मिळाल्यावर लोक तळ्याच्या काठी जमा झाले. शेवटी अग्निशमन दलाच्या जवानांना बोलावून मृतदेह पाण्‍याबाहेर काढण्यात आला. अधिक तपास सुरू आहे.

वीज कोसळल्याने ‘मोपा’वर खोळंबा

Mopa Airport

मोपा विमानतळावर बुधवारी (आज) संध्याकाळी 5.15 च्या सुमारास जोरदार पडणाऱ्या पावसात वीज कोसळल्याने धावपट्टीवरील दिशादर्शक दिवे बंद पडले. त्यामुळे या विमान उड्डाण व विमान लॅंडींग सेवा दुसरी धाव पट्टी उपलब्ध नसल्याने सुमारे दीड तास बंद ठेवण्यात आली.

परिणामी इंडिगोच्या विमानसेवेचा दीड तास खोळंबा झाला. दिशादर्शक दिव्यांची दुरुस्ती करण्यात आल्यावर रात्री 8.45 वा. विमानसेवा पूर्ववत सुरू करण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com