Goa Daily News Wrap: राजकारण, गुन्हे, क्रीडा विश्वातील ठळक घडामोडींचा आढावा

Goa Today's Live News 01 April 2024 Update Breakings In Marathi: क्राईम, राजकारण, पर्यटन, क्रीडा यासह विविध क्षेत्रात दिवसभरात गोव्यात घडणाऱ्या ठळक घडमोडींचा आढावा.
Goa and Konkan News
Goa and Konkan NewsDainik Gomantak

वालांका आलेमाव यांचा GFA अध्यक्ष कायतान फर्नांडीस यांच्या विरोधात मानहानीचा दावा

दिपक शर्मा यांच्या विरोधात तक्रार दाखल न करण्यासाठी महिला फूटबॉल खेळाडूंवर दबाव निर्माण केला असा आरोप गोवा फुटबॉल संघटनेचे अध्यक्ष कायतान फर्नांडीस यांनी केला. यावरुन आता वालांका आलेमाव यांनी कायतान यांच्या विरोधाक मानहानीचा दावा टाकला आहे.

गोव्यात सात सक्रिय कोरोना रुग्ण

गोव्यात सात सक्रिय कोरोना रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत राज्यात नव्याने एकही कोरोना बाधित रुग्णाची नोंद झालेली नाही.

कार्लुस आल्मेदांची भाजपात घरवापसी!

भाजपचे वास्कोचे माजी आमदार कार्लुस आल्मेदांची पुन्हा भाजपात घरवापसी. 2022ची विधानसभा निवडणूक लढवली होती काँग्रेसच्या तिकीटावर. आल्मेदांचा मंगळवारी पणजीत समर्थक नगरसेवकांसमवेत भाजप पक्षप्रवेशाचा कार्यक्रम.

पणजीतील 'स्मार्ट सिटी बसेस' लांबणीवर!

पणजी शहरात स्मार्टसिटी प्रकल्पा अंतर्गतची 'स्मार्ट सिटी बसेस' योजना पडली लांबणीवर. शहरातील स्मार्ट सिटीच्या अर्धवट कामांमुळे योजना जूनपर्यंत पुढे ढकलण्याची सरकारवरच नामुष्की.

Goa Today's Live News | Panaji Smart Buses
Goa Today's Live News | Panaji Smart BusesDainik Gomantak

उच्च न्यायालायाच्या न्यायाधिशांकडून स्मार्ट सिटीच्या कामांची पहाणी!

Panaji Smart City

पणजीतील रेंगाळलेल्या आणि लोकांसाठी डोकेदुखी ठरलेल्या स्मार्ट सिटीच्या कामांची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून पहाणी सुरू. स्मार्ट सिटीचे अधिकारी संजीत रॉड्रिग्ज देत आहेत कामांचा आढावा.

Panaji Smart City
Panaji Smart CityDainik Gomantak

पणजीत पाणी फवारणी; आज उच्च न्यायालयाकडून पाहणी

Panaji Smart City

स्मार्ट सिटी पणजीतील कामाची पाहणी आज (दि. 01 एप्रिल) केली जाणार आहे. त्यापूर्वी पणजीतील पणजीतील धूळ प्रदूषण रोखण्यासाठी कामाच्या ठिकाणी पाण्याची फवारणी केली जात आहे.

तीन महिन्यांपासून बेपत्ता, गावणे धरणात आढळला महिलेचा मृतदेह

Gaunem Dam

तीन महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या पोमू गावकर यांचा कुजलेला अवस्थेतील मृतदेह गावणे धरणात आढळून आला आहे.

Goa Today's Live News | Goa Crime
Goa Today's Live News | Goa CrimeDainik Gomantak

रेल्वतून मद्याची वाहतूक, दोघांना अटक

Konkan Railway

रेल्वेतून अवैधपणे मद्याची वाहतूक केल्याप्रकरणी कोकण रेल्वेने दोघांना अटक केलीय आहे.

Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak

बालाजी गावस यांचा भाजपात प्रवेश!

एमजीपीला रामराम करून धारबांदोड्याचे सरपंच बालाजी गावस यांचा भाजपात प्रवेश संपन्न. प्रदेशाध्यक्ष तानावडे व दक्षिण गोव्याच्या उमेदवार पल्लवी धेंपेंच्या उपस्थितीत भाजप प्रवेश.

Dainik Gomantak

गोव्याचा राखणदार! विजय सरदेसाईंचा ब्रिटनमध्ये गौरव

Vijai Sardesai

ब्रिटनमधील गोमन्तकीय समुदायाच्या वतीने आमदार विजय सरदेसाई यांचा 'गोव्याचा राखणदार' म्हणून गौरव.

भावी पिढ्यांसाठी गोंयकारपण आणि गोव्याचे रक्षण करायचे असल्यास प्रत्येकाने 'गोव्याचा राखणदार' व्हायची गरज. सीमा विरहीत गोवा अशी चळवळ सुरू करण्याची गरज सरदेसाईंनी यावेळी बोलून दाखवली.

viaji sardesai
viaji sardesaiDainik Gomantak

दहावीची परीक्षा सुरु.

Goa SSC Exam

गोवा शालांत मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षेला सुरवात. एकूण १९,५७३ विद्यार्थी परिक्षा देत असून, यात ९,७५७ मुले तर ९,८१६ मुलींचा समावेश.

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Goa SSC
Goa SSCDainik Gomantak

बालाजी गावस यांचा मगोला रामराम, भाजपात प्रवेश करणार!

धारबांदोडा पंचायतीचे सरपंच बालाजी गावस यांचा मगोला रामराम. सदस्यत्वाचा दिला राजीनामा. आज भाजपात प्रवेश करणार.

Balaji Gauns
Balaji GaunsDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com