Indian Super League: पश्चिम बंगालचा नारायण दास एफसी गोवा संघात

बचावफळीत समावेश: यापूर्वी दोन वेळा आयएसएल माजी उपविजेत्यांचे प्रतिनिधित्व
Narayan Das
Narayan DasDainik Gomantak

Indian Super League एफसी गोवा संघाने आगामी 2023-24 मोसमासाठी बचावपटू नारायण दास याला करारबद्ध केले. इंडियन सुपर लीग (आयएसएल) फुटबॉल स्पर्धेतील माजी उपविजेत्या संघातर्फे तो यंदा तिसऱ्यांदा खेळेल.

पश्चिम बंगालमधील नारायण यापूर्वी 2014 आणि नंतर 2017-18 मोसमात एफसी गोवा संघातर्फे खेळला होता. ‘‘येथे पुन्हा येताना मला खूप छान वाटत आहे. मी गोव्यात खूप फुटबॉल खेळलो असून हे माझे दुसरे घर असल्याचे मानतो.

Narayan Das
Matoli Bazar: म्हापशात माटोळी बाजारासाठी संपूर्ण ‘लेन’

आता मी पुन्हा एफसी गोवा संघात दाखल झालो असून मला येथे सर्वोत्तम कामगिरी करायची आहे,’’ असे नारायणने एफसी गोवाच्या करारपत्रावर सही केल्यानंतर सांगितले. ‘‘मी शेवटच्या वेळेस गोव्यात खेळल्यानंतर आता येथे भरपूर बदल झाले आहेत, मात्र चाहते आणि व्यवस्थापन बदललेले नाही.

चाहत्यांच्या सुरवातीपासूनचा उत्कट पाठिंबा कायम आहे. येथील प्रशिक्षण सुविधांची उंचावलेली श्रेणी पाहून मी प्रभावित झालो आहे,’’ असे 29 वर्षीय नारायण म्हणाला. ‘‘या वर्षी आमच्याकडे मानोलो मार्केझ यांच्यासारखे नावाजलेले प्रशिक्षक आहेत.

Narayan Das
Amarnath Panjikar: 'मिशन टोटल कमिशन'साठी पैसा परंतु SC, ST, OBC, खेळाडूंसाठी सरकारची तिजोरी रिकामी?

त्यांनी भारतीय फुटबॉलमध्ये आश्चर्यकारक कामगिरी केली आहे आणि मी त्याच्या हाताखाली खेळण्यास उत्सुक आहे,’’ असे नारायण पुढे म्हणाला.

नारायण दासचा अनुभव एफसी गोवासाठी फायदेशीर ठरेल, असे मत रवी पुस्कुर यांनी नव्या खेळाडूचे संघात स्वागत करताना सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com