Chess player Ethan Vaz: जगातील सर्वात लहान इंटरनॅशनल मास्टर एथनचे गोव्यात स्वागत

Chess player Ethan Vaz: एथन व्हाझ हा राय येथील विद्यार्थी आहे.
Chess player Ethan Vaz
Chess player Ethan VazDainik Gomantak

Chess player Ethan Vaz : गोव्यातील बाल आश्चर्य मानला जाणारा बुद्धिबळपटू एथन व्हाझ याने हल्लीच हंगेरी येथील स्पर्धेत खेळताना इंटरनॅशनल मास्टर किताब मिळवून जगातील सर्वात लहान वयाचा इंटरनॅशनल मास्टर बनण्याचा मान मिळविला.

आज ही स्पर्धा संपवून तो गोव्यात पोहोचला त्यावेळीं त्याचे सहर्ष स्वागत करण्यात आले.

एथन व्हाझ हा राय येथील विद्यार्थी असून रायचे सामाजिक कार्यकर्ते आणि भाजप एसटी मोर्चाचे उपाध्यक्ष अँथनी बार्बोजा यांनी त्याचे स्वागत केले.

एथनने हा किताब जोडून राय गावचे नाव आंतर राष्ट्रीय स्तरावर पोहोचविले असे बार्बोजा यांनी यावेळी सांगितले. यावेळी त्यांच्या बरोबर एथनचे प्रशिक्षक प्रकाश विक्रम सिंग हेही उपस्थीत होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com