​Goa School : शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शाळांची देखभाल झाली सुरू

दहावीच्या निकालानंतर लगबग : अभ्यासक्रम, दिवे, बेंच व इतर सुविधांची तपासणी
Goa School
Goa SchoolGomantak Digital Team

Goa School : राज्यातील शाळांनी आगामी शैक्षणिक अभ्यासक्रमासाठी जलदगतीने देखभाल आणि नियोजन करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. शाळा पुन्हा सुरू होण्याच्या तयारीत शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन व्यस्त आहेत. उन्हाळी सुट्टी संपण्याच्या मार्गावर असून शाळा व्यवस्थापनांनी वार्षिक शाळा नियोजन आणि शाळेच्या पायाभूत सुविधांची देखभाल करण्यास प्रारंभ केला आहे.

नागवा पॅक्स शाळेच्या मुख्याध्यापिका ऑलिम्पिया परेरा यांनी सांगितले, की दहावीचा निकाल लागल्यानंतर लगेचच आम्ही तयारी सुरू केली आहे. शाळेच्या प्रयोगशाळेत आम्ही काही पायाभूत बदल केले. याशिवाय या शैक्षणिक वर्षासाठी विषयनिहाय शालेय अभ्यासक्रम, कार्यक्रम तयार करण्याचे काम शाळेतील शिक्षकांना देण्यात आले आहे. श्री शारदा मंदिर हायस्कूल कुडचडेचे अध्यक्ष प्रहर सावर्डेकर यांनी सांगितले की, या शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी शाळेने वार्षिक देखभाल करण्याची तयारी केली आहे. शाळेतील दिवे, बेंच व इतर सुविधांची तपासणी सुरू आहे.

Goa School
Amir Khan - Fatima Viral Video : आमिर खानचा डिव्होर्स त्यानंतरच्या फातिमासोबत रिलेशनच्या अफवा अन् हा व्हायरल व्हिडीओ

आम्ही शाळेच्या देखभालीकडे लक्ष देत आहेत. आता आम्ही शालेय उपक्रमांसाठी मॅन्युअल तयार करण्याच्या प्रक्रियेत आहोत, पाचवीत येणाऱ्या नवीन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याची तयारी आणि नियोजन सुरू आहे. शालेय गणवेश धोरण, अशा अनेक विषयांवर चर्चा काही दिवसांत होणार आहेत.

प्रदीप काकोडकर, अध्यक्ष, द न्यू एज्युकेशन इन्स्टिट्यूट

Goa School
Mumbai Session Court : “वेश्या व्यवसाय गुन्हा नाही, पण…” सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय

शैक्षणिक वर्षात शाळा पुन्हा सुरू होण्यापूर्वी अनेक उपक्रम होत आहेत. शाळेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती, किरकोळ दुरुस्ती आणि बेंच बदलणे, ओळखपत्रे तयार करणे, शालेय दिनदर्शिका, प्रवेश, वार्षिक शालेय अभ्यासक्रम तयार करणे इ. गोवा मुख्याध्यापक संघाने आम्हाला पाठवलेल्या परीक्षेचे वेळापत्रक आम्ही पाळणार आहोत.

स्वप्निता नागवेकर, मुख्याध्यापिका, सारस्वत हायस्कूल, म्हापसा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com