'पदरी आठ वर्षाची लेक, पतीचं निधन, ढासळलेले घर'; संकट झेलणाऱ्या 'वर्षा'ला राणेंचा दिलासा

आमदार दिव्या राणेंकडून मदत : घर उभारण्याबरोबरच मुलीला शिकविण्याचे ध्येय
MLA Deviya Rane
MLA Deviya RaneDainik Gomantak

MLA Deviya Rane जुने मातीचे घर हटवून त्या जागी नवे घर बांधण्यास सुरवात केली, त्याच वेळी नवऱ्याने जगाचा निरोप घेतला, त्यामुळे तिच्यावर दुहेरी संकट ओढवले. पदरी आठ वर्षांची मुलगी होती, पती गेला आणि आता घरही नाही, त्यामुळे मुलीला घेऊन राहायचे कुठे हा प्रश्‍न होता.

गावातच भाड्याची खोली घेउन ती राहू लागली. पण कमावता पुरुष गेल्याने आर्थिक संकट होते. नवरा सरकारी नोकरीत होता, पण तिला पेन्शनचा लाभ मिळत नव्हता, त्यामुळे या मायलेकीची स्थिती अधिकच बिकट झाली होती. याची माहिती मिळताच पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी या महिलेला सढळ हस्ते आर्थिक मदत करून दिलासा दिला आहे.

ही गोष्ट, झर्मे सत्तरी येथील वर्षा सम्राट गावस व तिच्या आठ वर्षांच्या मुलीची आहे. वर्षाचा पती सम्राट हा आरोग्य खात्यात नोकरी करीत होता. पदरी ८ वर्षांची मुलगी होती. या दांपत्याने आपले जुने घर पाडून तिथे नवे घर उभारण्याचे स्वप्न पाहिले आणि त्यानुसार कामालाही सुरवात केली.

पण जुने घर पाडून नवे घर उभारण्यास सुरवात केली असता, तोच अचानक सम्राट याला देवाज्ञा झाली आणि वर्षा हिच्यावर दुहेरी संकट कोसळले. पती गेला आणि आता घरही नव्हते, त्यामुळे भाड्याच्या खोलीत आसरा घेण्यावाचून तिच्यासमोर दुसरा पर्याय नव्हता.

नवऱ्याच्या निधनानंतर तिची आर्थिक स्थिती फारच खालावली. नवरा सरकारी नोकरीला होता, पण पेन्शन अजून मिळत नव्हती. पदरी चार पैसे होते तेही खर्च झाल्याने या मायलेकीवर उपासमारीची वेळ आली.

वर्षा गावस यांनी सांगितले की, पतीचे निधन झाल्यानंतर आम्ही पूर्ण संकटात होतो. मुलगी लहान आहे, तिला शिकवायचे आहे. नव्या घराचे स्वप्न पाहिले होते, पण नवऱ्याने अर्ध्यावरच साथ सोडली. आता कसे जगायचे, घर कसे उभारायचे हाच मोठा प्रश्न होता.

स्थानिक पंच गुरुदास गावस यांच्यामुळे आपला विषय आमदार डॉ. दिव्या राणे यांच्यापर्यंत गेला व त्यांनी आर्थिक मदत केली आहे. या पैशातून राहण्यासाठी आसरा उभारण्याचा आपला प्रयत्न राहील, असे तिने सांगितले.

पंच गुरुदास गावस यांनी सांगितले की, वर्षा ही गरीब असून तिच्या पतीचे गेल्या वर्षी निधन झाले. याची कल्पना आपण स्थानिक पंच या नात्याने आमदार दिव्या राणे यांना दिली असता त्यांनी तातडीने या महिलेला मदत पुरवण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार मंगळवारी एक लाखाची मदत केली, असे त्यांनी सांगितले.

MLA Deviya Rane
Goa Government: दिवाळी सुट्टीबाबत सरकारने पुनर्विचार करावा : लोलयेकर

डॉ. राणेंकडून 1 लाखाची मदत

स्थानिक पंच गुरुदास गावस यांच्याकडून या महिलेबाबत माहिती मिळताच पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी याची दखल घेत या महिलेला एक लाखाची तातडीची मदत केली. मंगळवारी ही रक्कम वर्षा हिला सुपूर्द केली.

याबाबत डॉ. राणे म्हणाल्या की, सत्तरी हे आमचे कुटुंब आहे, कुणावर काही संकट ओढवले तर त्याला मदत करणे हे आमचे प्रथम कर्तव्य आहे. सत्तरीचा सर्वांगीण विकास करताना येथील वंचित घटकाचे जीवनमान उंचावणे हे उद्दिष्ट आहे.

सत्तरीतील प्रत्येक कुटुंबाच्या स्थितीचा आढावा घेऊन त्यांना मदत करण्याच्या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत, असे त्या म्हणाल्या.

MLA Deviya Rane
'3,000 कोटींचा घोटाळा, पेडण्यात मंत्री राणेंनी केले कोट्यवधी चौ.मी जमीनचे रूपांतर'; काँग्रेसचा आरोप

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com