'3,000 कोटींचा घोटाळा, पेडण्यात मंत्री राणेंनी केले कोट्यवधी चौ.मी जमीनचे रूपांतर'; काँग्रेसचा आरोप

प्रत्येकी 100 चौरस मीटरसाठी राणे यांना दोन हजार रुपये मिळत आहेत - अमित पाटकर
Amit Patkar
Amit Patkar Dainik Gomantak
Published on
Updated on

3,000cr land scam in Pernem Goa: नगर नियोजन मंत्री विश्वजित राणे पेडणे तालुक्यातील 1.4 कोटी चौरस मीटर जमीन रूपांतरित करण्याची योजना आखत आहेत, असा आरोप गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (जीपीसीसी) अध्यक्ष अमित पाटकर यांनी बुधवारी केला.

पेडण्यात रुपांतरित केलेल्या जमीन प्रकरणाचा घोटाळा 3,000 कोटी रुपयांचा असल्याचा आरोप देखील पाटकर यांनी केला आहे.

'पेडणे तालुक्यात 1 कोटी 44 लाख 77 हजार 663 चौरस मीटर जमीन मंत्री विश्वजीत राणे यांनी रूपांतरित केली आहे. प्रत्येकी 100 चौरस मीटरसाठी राणे यांना दोन हजार रुपये मिळत असून, हा घोटाळा 3000 कोटी रुपयांचा आहे. रुपांतर केलेल्या जमिनीत कृषी, नैसर्गिक आणि हरित क्षेत्राचा समावेश आहे,' असा आरोप पाटकर यांनी केला आहे.

'गोव्याची शान असलेला पेडणे तालुका दिल्लीकरांना विकला जात आहे. 1.44 कोटी चौरस मीटर जमीन कोणासाठी रुपांतरित केली? गोव्यातील लोकांना याची गरज आहे का?' असा सवाल राणे यांनी उपस्थित केला.

'गोव्यात जमिनीचा तुटवडा आहे. राज्यात मोठ्या प्रमाणावर वन आण खाण क्षेत्र आहे. उर्वरीत क्षेत्राचे संरक्षण केले पाहीजे पण, सरकार आमची जमीन आणि पर्यायाने राज्य विकत आहे,' असा सनसनाटी आरोप पाटकरांनी केला.

पेडण्यातील लोकांनी हा मुद्दा त्यांच्याकडे उपस्थित केल्याचे पाटकर म्हणाले. तसेच, स्थानिक आमदारांनी याप्रकरणी आवाज उठवला पाहिजे असेही पाटकर म्हणाले.

सरकारने जमीन रुपांतर करण्याची प्रक्रिया न थांबवल्यास चोपडे-शिवोली ब्रिज ब्लॉक करण्याचा इशारा स्थानिकांनी दिला आहे. काँग्रेसने स्थानिकांना यासाठी पाठिंबा दिला आहे. आता पेडण्याचे आमदार स्थानिकांसोबत आहेत का सरकारसोबत याबाबत त्यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही पाटकरांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com