कौतुकास्पद ! कृषी क्षेत्रातील पदवीधर 'श्‍‍वेता' करतेय ताडी काढण्‍याबरोबरच माड पाडण्याचं काम

ती इतरांना प्रशिक्षणही देते. धाडसाची कामे केवळ पुरुष मंडळींचीच राहिलेली नाहीत तर ती महिला, युवतीही सहजपणे करू शकतात हे ती पटवून देते.
Sweta Gaonkar
Sweta GaonkarDainik Gomantak
Published on
Updated on

Sweta Gaonkar: सांगे भागात स्वतःच्या हिमतीवर पदवीपर्यंत शिक्षण, त्यानंतर धाडसाची कामे आणि इतरांनी आपल्या कार्याचा आदर्श घ्यावा अशी कामगिरी करणारी युवती म्‍हणजे आमडई-सांगे येथील श्‍‍वेता कुशाली गावकर. कृषी क्षेत्रात पदवीधर असलेली ही युवती ताडी काढण्याचे आणि नारळ पाडण्याचे काम सहज करते.

खडतर प्रवास आणि जिद्धीने मिळविलेले यश यात हुरळून न जाता अजूनही श्‍‍वेताने आपले पाय जमिनीवर ठेवले आहेत. गरीब कुटुंब असले तरी लहानपणापासून शिक्षणात हुशार.

दहावी व बारावीपर्यंतचे शिक्षण सांगेत झाले. त्‍यानंतर ती कृषी क्षेत्रात प्रवेश घेऊन पदवीधर बनली. खासगी कृषी आस्थापनात नोकरीची संधी मिळाल्याने तांत्रिक शिक्षण घेण्यासाठी बेंगलोर येथे तिने प्रशिक्षण घेतले.

माडावर चढून नारळ काढणे हे काम तसे कठीण व जिकिरीचे. आता मदतीला यंत्र असले तरी काही पुरुषही माडावर चढण्‍यास धजावत नाहीत. रेंदेर जसा माडावर चढून ताडी काढतो, त्याच पद्धतीने श्‍‍वेता गावकर ही ताडी काढण्याचे आणि नारळ पाडण्याचे काम करते.

ती इतरांना प्रशिक्षणही देते. धाडसाची कामे केवळ पुरुष मंडळींचीच राहिलेली नाहीत तर ती महिला, युवतीही सहजपणे करू शकतात हे ती पटवून देते.

डेअरी, बागायती सांभाळते; ट्रॅक्‍टर चालवून गवत आणते

सध्या श्‍‍वेता गावकर ही सांगे येथील तिंबलो कंपनीच्या कृषी फार्ममध्ये काम करत आहे. तेथेही कामापुरती मर्यादित न राहता गाईगुरांना लागणारे गवत स्वतः ट्रॅक्टर चालवून आणण्याचे काम करते. फार्ममधील डेअरी, बागायती सांभाळणे आदी कामे करते.

स्वतः कृषी पदवीधर बनली आणि आपल्या पाठीमागच्या बहिणीलासुद्धा तिने कृषी पदवीधर बनविले. शिवाय सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करताना आपल्या गावातील महिलांना पारंपरिक फुगड्या अधिक विकसित पद्धतीने कशा प्रकारे घातल्या जातात, याचे प्रशिक्षणही देते. या युवतीच्‍या कामाचा आदर्श घेण्‍यासारखा आहे.

Sweta Gaonkar
'सहा राज्य, एक बाजारपेठ'; गोवासह विविध राज्य मंडई, कोल्ड स्टोअर्स करणार शेअर, शेतकऱ्यांना होणार फायदा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com