
Road Construction: अनेक वर्षांपासून स्थानिकांची मागणी असलेल्या सडये तसेच मार्ना-शिवोली जोडरस्ता दुरुस्तीचे काम सध्या जोरात सुरू असून येत्या मार्च अखेरपर्यंत हा रस्ता नियमित वाहतुकीसाठी खुला होईल.
या कामामुळे वाहतुकीत सुसूत्रता येण्यासह स्थानिक शेतकऱ्यांची शेतीही टिकणार आहे, असे सडयेच्या सरपंच दीपा पेडणेकर यांनी दै. ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले. अनेकदा आमदार, मंत्र्यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली अनेक कामे नंतर वेग घेत नाहीत.
त्यामुळेच शिवोलीच्या आमदार दिलायला लोबो यांच्या संमतीनेच नियमितपणे येथील कामाचा आढावा घेण्याचे सडये पंचायत मंडळाने ठरवल्याची माहिती उपसरपंच नीलेश वायंगणकर यांनी दिली.
नैसर्गिक सौंदर्याची उधळण आणि दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात शेत जमीन असलेल्या येथील रस्त्याची दुरुस्ती पूर्ण होताच सडये तसेच शिवोलीच्या शेतकऱ्यांना पुन्हा शेतीत पीक घ्यायची संधी मिळणार आहे, असे वायंगणकर यांनी सांगितले.
जोडरस्ता संपूर्ण पेडणे तालुक्याला बार्देश तालुक्याशी जोडणारा असून त्यामुळे येथील वाहतुकीतही सुसूत्रता येईल, असे सचिन मांद्रेकर म्हणाले.
"गेली अनेक वर्षे मार्ना-शिवोली पंचायत मंडळाकडून येथील जोडरस्त्याच्या दुरुस्तीचा विषय वारंवार लावून धरला जात होता. आमदार दिलायला लोबो यांनी ही मागणी केवळ ऐकूनच घेतली नाही. तर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्याने धसास लावली. हा जोडरस्ता पूर्ण होताच वाहतुकीत सुसूत्रता येईल."
- शर्मिला वेर्णेकर, सरपंच, मार्ना-शिवोली
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.
दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.