Goa Rain Update: गोव्यात पुढील आठवड्यात दोन दिवस पावसाची शक्यता

पावसामुळे राज्यातील वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
Rain Update
Rain UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Rain Update: गोव्यात येत्या आठवड्यात दोन दिवस पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) 10 ते 11 डिसेंबर या कालावधीत हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

पावसामुळे राज्यातील वाढत्या तापमानापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

गुरुवारी राज्यभर कोरडे हवामान होते, पणजी आणि दाबोळीत कमाल 33.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले.

भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार 8, 9, 12 आणि 13 डिसेंबर रोजी गोव्यात हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तसेच, राज्यात काही ठिकाणी धुके पडण्याची शक्यता आहे.

Rain Update
100 टक्के रेबीजमुक्तीसाठी मुंबईत आता 'गोवा मॉडेल', 'मिशन रेबीज'चा BMC सोबत करार

ऐन पर्यटन हंगामात राज्यात देशी - विदेशी पर्यटक दाखल होत आहेत. महाराष्ट्र, कर्नाटकसह देशातील इतर राज्यात थंडी जाणवत असताना गोव्यात थंडीला सुरुवातच झालेली नाही.

उन्हामुळे त्रासलेल्या स्थानिक आणि पर्यटकांना पावासाच्या शिडकाव्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com