Power Tariff Hike in Goa: नवीन वर्षाच्या तोंडावर गोमंतकीयांना वीज दरवाढीचा शॉक

Power Tariff Hike in Goa: घरगुती ग्राहकांच्या वीज वापर दरात 10 ते 70 पैसे दरवाढ नियोजित
Power Tariff Hike in Goa
Power Tariff Hike in GoaDainik Gomantak

Power Tariff Hike in Goa: राज्य सरकारने पुन्हा एकदा वीज दरवाढ करण्याचा निर्णय घेतला असून, नववर्षाच्या तोंडावर गोमन्तकीयांना दरवाढीचा शॉक बसला आहे. यापूर्वी देखील करण्यात आलेल्या दरवाढीवरुन मोठा वादंग पाहायला मिळाला होता.

प्रस्तावित दरवाढीनुसार, घरगुती ग्राहकांच्या वीज वापर दरात 10 ते 70 पैसे दरवाढ नियोजित आहे. यामुळे नवीन वर्षांत गोमन्तकीयांच्या खिशावर अधिक ताण येणार आहे.

Power Tariff Hike in Goa
Bhoma Road Expansion: भोममध्ये महामार्गाचा वाद उफाळला; झाडांच्या सिमांकनाला विरोध करणाऱ्यांना पोलिसांची धरपकड

या संबंधी काही महिन्यांपूर्वी माहिती समोर आली असून, 'राज्य सरकार आपल्या विजेच्या गरजेसाठी केंद्रावर अवलंबून असून गोव्यात केवळ 33 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाते.

सध्या आम्हाला आमच्या विजेच्या गरजेसाठी एनटीपीसीवर अवलंबून राहावे लागत आहे.

2030 पर्यंत राज्यात 150 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे' वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांनी याआधी सांगितले होते.

तसेच 2030 पर्यंत राज्यात 150 मेगावॅट वीजनिर्मिती करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची माहितीही त्यांनी या आधी दिली होती.

सरकारने 2023-24 या आर्थिक वर्षासाठी वीज दरात 6 टक्के वाढ प्रस्तावित केली आहे. तसेच वीज नियामक आयोग वीज दरवाढीचा निर्णय घेणार आहे.

येत्या सहा महिन्यांत आम्हाला प्राधिकरणाकडून दिशा मिळण्याची अपेक्षा आहे.

जर वीज दरवाढीला मंजुरी देण्यात आली तर राज्य मंत्रिमंडळ दरवाढीच्या किमतीबाबत निर्णय घेईल, अशी माहिती ढवळीकरांनी या अगोदर काही महिने दिली होती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com