Bhoma Road Expansion: भोममध्ये महामार्गाचा वाद उफाळला; झाडांच्या सिमांकनाला विरोध करणाऱ्यांना पोलिसांची धरपकड

Bhoma Road Expansion: भोमगावातील रस्त्याच्या कामावरुन तणाव
Bhoma Road Expansion
Bhoma Road ExpansionDainik Gomantak

Bhoma Road Expansion: काही महिन्यांपासून सुरु असलेला भोम गावातील नियोजित रोड आणि ग्रामस्थांचा त्याला असलेला विरोध या प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत.

आज बुधवारी सार्वजनिक बांधकाम खाते, वन खाते तसेच संबंधित सर्व सरकारी खात्याच्या कर्मचाऱ्यांनी भोम रस्ता मुल्यांकनासाठी सर्वेक्षण सुरू केल्यावर भोम ग्रामस्थांनी त्याला विरोध केला.

तसेच घोषणाबाजी सुरु करून हायवे रुंदीकरणासाठी झाडांच्या सिमांकन प्रक्रियेला विरोध करणाऱ्या विरोधकांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे.

Bhoma Road Expansion
Goa-Ayodhya Flight: गोयंकरांसाठी राम लल्लाचं दर्शन दृष्टीक्षेपात, 31 डिसेंबरला गोव्यातून आयोध्येला पहिली फ्लाइट

काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय नेत्यांनी भोमवासियांच्या आंदोलनात सक्रिय सहभाग दर्शवला होता. सरकारने जबरदस्ती केल्यास मुख्य महामार्ग रोखण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला होता.

मागील वर्षभरापासून स्थानिक लोक सरकारविरुद्ध लढा देत आहेत. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याने ग्रामस्थांनी सध्या आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. आज पुन्हा भोमवासीयांचा उद्रेक पाहायला मिळाला.

गोव्यात पर्यावरणाचा ऱ्हास चालला आहे. लोकांच्या विरोधात भाजप सरकार निर्णय घेत आहे. भोमवासीयांना जाचक ठरलेला आणि गावाला त्रासदायक ठरलेला नियोजित रस्ता त्वरित रद्द करावा अन्यथा याप्रकरणी मोठे आंदोलन पुकारले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com