Goa Political News: ध्वनीफित वाजवली, पसरवली मात्र नाही! वेळीप यांचे तवडकरांवर शरसंधान

रमेश तवडकर ः वादावर पुन्हा फुंकर
Ramesh Tawadkar- Govind Gaude Dispute
Ramesh Tawadkar- Govind Gaude DisputeDainik Gomantak

Ramesh Tawadkar- Govind Gaude Dispute

विधानसभा सभापती रमेश तवडकर आणि कला संस्कृतीमंत्री गोविंद गावडे वादावर मुख्यमंत्री डॉ. सावंत आणि भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला तरी हे नाट्य सुरूच ठेवण्याचा विडा काहींनी उचलला आहे.

आजच्या पत्रकार परिषदेत नाट्यमयरित्या होय, मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीत ती ध्वनीफित आपणच वाजवली होती, अशी कबुली तवडकर यांनी दिली. मात्र, ती ध्वनीफित आपण सार्वत्रिक केली नाही, असेही त्यांनी तत्काळ सांगितले.

खोतीगावातील वाड्यावर काही संस्थांना विविध कार्यक्रमांसाठी कला व संस्कृती खात्याने २६ लाखांचे अनुदान दिल्याने नाराज तवडकर यांच्यामुळे सुरू नाट्याने वेगळे वळण घेतले आहे. गावडे आदिवासी कल्याण संचालक रेडकर यांच्याशी असभ्य भाषेत बोलत असल्याची ध्वनीफित सार्वत्रिक झाल्यानंतर तवडकर यांच्याकडे बोट जात होते. मात्र, आपण ती ध्वनीफित सार्वत्रिक केली नाही, असे सांगितले आहे. त्यामुळे रेडकर यांनी मोबाईलवर ते संभाषण मुद्रीत केले तर त्यांनी कोणासाठी केले, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वेळीप यांचे तवडकरांवर शरसंधान

दरम्यान, युनाटेड ट्रायबल अलायन्स (उटा)चे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी पणजीत पत्रकार घेत थेटपणे तवडकर यांच्यावर शरसंधान केले. तवडकर हे आपल्या संस्थेसाठी सरकारकडून मोफत जागा मिळवतात, असाही त्यांचा आरोप आहे. बलराम संस्थेच्या शैक्षणिक संकुलावरील खर्चाबाबतही त्यांनी संशय व्यक्त केला. यामुळे गावडे, तवडकर, भाजप आणि विधानसभेपुरत्या मर्यादित विषयात ‘उटा’ने का उडी घेतली, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शाळेचे बांधकाम आपण आमदार नसताना !

तवडकर यांनी पत्रकार परिषद घेत आरोप नाकारले. त्यांनी बलराम संस्थेच्या शाळेचे बांधकाम ‘जीएसआयडीसी’ने आपण आमदार नसतानाही केले, असे सांगून त्याच्या खर्चाचा तपशील त्यांनी पत्रकारांसमोर सादर केला. लोकोत्सव २००० मध्ये प्रथम आमदार होण्याआधी सुरू केला आणि तो आमदार नसतानाही सुरू ठेवला होता, याकडे लक्ष वेधले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com