Sunburn Festival 2023 मध्ये ड्रग्ज तपासणीसाठी पोलिस सज्ज; डॉग स्क्वॉडसह खास पथके तैनात

राज्यातील बीचसह महत्वाच्या ठिकाणांवर असणार लक्ष
Goa Police and Sunburn Festival 2023
Goa Police and Sunburn Festival 2023Dainik Gomantak

Sunburn Festival 2023: दक्षिण आशियातील सर्वात मोठा इलेक्ट्रॉनिक डान्स म्युझिक (EDM) फेस्टिव्हल असणाऱ्या सनबर्न फेस्टिव्हलला गोव्यातील वागातोर येथे 28 डिसेंबरपासून सुरवात होत आहे. 28, 29 आणि 30 डिसेंबर असे 3 दिवस हा महोत्सव रंगणार आहे.

दरम्यान, सनबर्न महोत्सवात अमली पदार्थांचा शोध घेण्यासाठी गोवा पोलिसांनी विशेष पथके तयार केली आहेत. यात डॉग स्क्वॉडसह पोलिसांच्या खास पथकाचा समावेश आहे.

पोलीस अधीक्षक (उत्तर) निधीन वलसन यांनी बुधवारी पणजी येथे पत्रकारांना ही माहिती दिली. ही पथके राज्यातील पूर्ण किनारपट्टी परिसरात आणि सनबर्न ईडीएम महोत्सवासारख्या महत्त्वाच्या ठिकाणी सक्रिय असतील.

Goa Police and Sunburn Festival 2023
खुशखबर! गोव्याला मिळाली आणखी एक वंदे भारत एक्सप्रेस; मंगळूरू-मडगाव मार्गावर 'या' दिवसापासून धावणार

गोव्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. त्यामुळे या काळात गोव्यात बऱ्याचदा अमली पदार्थांची तस्करी होताना दिसून आली आहे. नवीन वर्ष आणि सनबर्न फेस्टिव्हल दरम्यान अमली पदार्थांचा वापर रोखण्यासाठी गोवा पोलिसांनी ही विशेष पथके तयार केली आहेत

राज्यात नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी हजारो पर्यटक येऊ लागल्याने गोवा पोलिसांनी अंमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी विशेष पथके नेमली आहेत.

निधीन वाल्सन म्हणाले की, स्थानिक पोलिस, गुन्हे शाखा, अंमली पदार्थ विरोधी सेल आणि फॉरेन्सिक तज्ज्ञांचा समावेश या पथकांमध्ये आहे.

ही पथके महत्त्वाच्या भागात गस्त घालतील. ड्रग पॅडलिंग, अमली पदार्थांचे सेवन किंवा कोणीतरी आधीपासून ते सेवन केले असेल आणि अमली पदार्थांच्या प्रभावाखाली असेल तर त्याचा तपास केला जाईल.

Goa Police and Sunburn Festival 2023
Julio Ribeiro: पंतप्रधान मोदींचा ख्रिसमस संदेश केवळ ख्रिश्चन मतांसाठी...

संशयित व्यक्तींची स्पेक्ट्रोमीटर वापरून कठोर चाचणी या पथकांतील सदस्य घेतली. याशिवाय जप्त केलेल्या पदार्थाच्या नमुन्यांची चाचणी घेतल्यानंतर त्वरित रिझल्ट कळणार आहे.

जर कोणाकडे अमली पदार्थ आढळून आले तर त्याच्यावर तत्काळ गुन्हा दाखल केला जाईल, असेही वाल्सन म्हणाले.

पोलिस अधीक्षक वाल्सन म्हणाले की, दारूच्या प्रभावाखाली असलेल्या व्यक्तींना तपासण्यासाठी राज्य पोलिसांनी मोबाईल रॅपिड स्क्रीनिंग चाचणी प्रणाली सुरू केली आहे.

जरी कोणी अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे आढळून आले तरी त्याच्यावर नार्कोटिक्स ड्रग्ज आणि सायकोट्रॉपिक पदार्थ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला जाईल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com