गोवा पर्यटन केंद्र नव्हे, तर सांस्कृतिक केंद्र बनावं - किरण सोनी गुप्ता

कला व संस्कृती संचालनालयातर्फे आयोजित प्रिंट मेकिंग शिबिराचा समारोप
Panjim
Panjim Dainik Gomantak

Panjim पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरचे गोवा हे महत्त्वाचे सदस्य राज्य असून गोवा हे पर्यटन केंद्र म्हणून नव्हे, तर सांस्कृतिक केंद्र म्हणून उदयास यायला हवे, असे नमूद करून पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या संचालक किरण सोनी गुप्ता यांनी प्रिंट मेकिंग कलेत विविधता आहे व तिला उत्तेजन दिले पाहिजे असे मत येथे व्यक्त केले.

पाटो - पणजी येथील संस्कृती भवनमधील बहुद्देशीय सभागृहात पश्चिम क्षेत्र सांस्कृतिक केंद्र आणि कला व संस्कृती संचालनालयाच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या प्रिंट मेकिंग शिबिराच्या समारोप सोहळ्यात श्रीमती गुप्ता बोलत होत्या.

Panjim
Electricity Problem: फोंडा-बोरीत विजेचा लपंडाव; वीज खात्याने वेळीच लक्ष घालण्याची नागरिकांची मागणी

व्यासपीठावर प्रमुख पाहुणे कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे, कला संस्कृती संचालनालयाचे संचालक सगुण वेळीप, उपसंचालक अशोक परब, सर्वोत्तम सातार्डेकर (उपसंचालक-लेखा) उपस्थित होते.

राष्ट्राची तुलना होते तेव्हा कला व संस्कृती किती समृद्ध आहे याचा विचार होतो असे सांगून श्रीमती गुप्ता म्हणाल्या, आजची समकालीन कला पुढच्या पिढीपर्यंत पोचली पाहिजे, कला संस्कृतीचा वारसा समृद्ध करायला हवा.

गोविंद गावडे यांनी सांगितले की, सामान्य माणूस विचार करायचे थांबतो, तेव्हा कलाकाराचे कलेच्या माध्यमातून विचारचक्र सुरू होते.

प्रिंट मेकिंगसाठी अधिकाधिक वाव देण्याचा प्रयत्न केला जाईल. जी २० विषयाला धरून या शिबिराच्या माध्यमातून प्रत्येक चित्रकाराने दाखविलेल्या कौशल्याचे त्यांनी कौतुकही केले.

Panjim
Landslide On NH 66: राष्ट्रीय महामार्गावर कोसळली दरड; वाहतुकीला अडथळा

सर जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील सीमा अजय गोंदाणे या शिबिरार्थी म्हणाल्या, या शिबिरातील अनुभव सर्वदृष्ट्या चांगला होत्या. जी 20 विषयामुळे राष्ट्रापती भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली. सगुण वेळीप यांनी स्वागत केले.

प्रदीप नाईक यांनी सूत्रसंचालन केले. अशोक परब यांनी आभार मानले. यावेळी कला संस्कृती संचालनालयाच्या शिल्पकला (फायबर ग्लास वर्क) कार्यशाळेतील सहभागींना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रशस्तिपत्रे प्रदान करण्यात आली.

Panjim
Goa Waterfall: सत्तरीतील धबधब्यांची पर्यटकांना भुरळ; आता पंचायतीने 'या' गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज

‘कला महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांवर अन्याय’

शिबिरात सहभागी झालेले गोमंतकीय प्रसिद्ध चित्रकार हनुमंत कांबळी यांनी पोर्तुगिजांनी गोव्यात पाचशे वर्षांपूर्वी राशोल येथे प्रिंटिंग प्रेस आणला होता ही आठवण सांगून ते म्हणाले, गोवा कला महाविद्यालयात प्रिंट मेकिंगची सामग्री नष्ट करून प्रवेश घेणाऱ्यांवर अन्याय केला. प्रिंट मेकिंगला व्यावसायिकदृष्ट्याही महत्त्व आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com