Panjim Smart City: रखडलेल्या स्मार्ट सिटीचे काम 31 मे पूर्वी पूर्ण होणार का? आमदार मोन्सेरातांनी केली कामाची पाहणी

Panjim Smart City: रस्ते खचून वाहने अडकण्याच्या घटना दर महिन्यांत घडत आहेत.
Panjim Smart City
Panjim Smart CityDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim Smart City: मागील काळापासून पणजीवासियांना तसेच कामानिमित्त राजधानीत येणाऱ्यांना स्मार्ट सिटीच्या सुरु असणाऱ्या खोदकामाचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.

त्यातच रस्ते खचून वाहने अडकण्याच्या घटना दर महिन्यांत घडत आहेत. नवीन वर्षाच्या सुरुवातीला जानेवारीमध्ये स्मार्ट सिटी संदर्भात पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी महत्वाची माहिती दिली होती.

शुक्रवारी पणजीचे आमदार बाबुश मोन्सेरात यांनी स्मार्ट सिटीचे मुख्य अधिकारी संजीत रॉड्रिग्स यांच्यासह स्मार्ट सिटीच्या कामाची पाहणी केली.

पणजी, सांतिनेज भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या रस्ता खोदकामामुळे स्थानिक व्यावसायिक आणि दुकानदारांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. या सततच्या होणाऱ्या रस्ता खोदकामामुळे अनेकांच्या व्यवसायावर संक्रांत आल्याचे स्थानिक व्यावसायिकांनी सांगितले.

बरेच दिवस रखडलेल्या स्मार्ट सिटीचे काम 31 मे पूर्वी पूर्ण होणार असल्याचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी सांगितले होते.

Panjim Smart City
Mapusa Court: हातात बियर घेऊन बुलेटवरून सैर; आसामच्या चालकाचा परवाना निलंबित, 10 हजार दंड

स्मार्ट सिटीच्या प्रत्येक दिवसाच्या कामकाजावर लक्ष ठेवले जात असून प्रत्येक कामकाजाचे व्यवस्थित नियोजन केले जात आहे. विकासात्मक कामे लवकरात लवकर काम पूर्णत्वाकडे जातील याकडे आम्ही लक्ष देत आहोत असे मोन्सेरात यांनी सांगितले होते.

स्मार्ट सिटी मिशनअंतर्गत सर्वात महत्त्वाच्या टप्प्यातील रस्त्याचे काम आता सुरू झाले आहे. सतत रहदारीचा रस्ता असणाऱ्या विवांता हॉटेल ते शीतल हॉटेलपर्यंतचा रस्ता आता स्मार्ट होणार आहे.

त्यासाठी रस्त्याचे जेसीबीद्वारे खोदकाम सुरू झाले असून, ताळगावला जाण्यासाठी कला अकादमी, बालभवन-अग्निशामक दल-मधुबन सोसायटी असा मार्ग वाहनधारकांना पकडावा लागणार आहे.

रस्त्याचे काम सुरू असले तरी दुचाकीस्वार आपला जीव धोक्यात घालून रस्त्याच्या बाजूच्या जागेतून मार्ग काढताना दिसत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com