Goa News: थिवी येथे कला आणि क्रीडा महोत्सवाचा शानदार शुभारंभ

थिवी ग्रामपंचायत आयोजित कला आणि क्रीडा महोत्सव 2023चे उद्‍घाटन मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते करण्यात आले. हा महोत्सव 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.
Goa News|Festival
Goa News|FestivalDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: थिवी ग्रामपंचायत आयोजित कला आणि क्रीडा महोत्सव 2023चे उद्‍घाटन मच्छीमार खात्याचे मंत्री नीळकंठ हळर्णकर यांच्या हस्ते थिवी फुटबॉल मैदानावर दीप प्रज्वलीत करून करण्यात आले. हा महोत्सव 28 फेब्रुवारीपर्यंत सुरू राहील.

यावेळी व्यासपीठावर थिवीचे सरपंच अर्जुन आरोसकर, उपसरपंच ॲड. हर्षता कलंगुटकर, सन्माननीय पाहुणे यशवंत बर्डे, पंच सदस्य तुळशीदास शिंदे, सुनिता साळगावकर, समीक्षा मयेकर, व्यंकटेश शिरोडकर, शिवम परब, महोत्सवाचे अध्यक्ष प्रा. सुभाष कवठणकर, सदस्य शौनक कवठणकर, माजी सरपंच तृप्ती शिंदे उपस्थित होते.

याप्रसंगी बोलताना हळर्णकर यांनी कला आणि क्रीडा महोत्सवाचे आयोजन करून थिवी पंचायत क्षेत्रातील तरुण तसेच वयस्कर ग्रामस्थांना विशेषत: महिलांना या महोत्सवात भाग घेण्याची संधी दिल्याबद्दल थिवी पंचायत मंडळाचे अभिनंदन केले.

शिक्षणाबरोबरच अशा अनेक कला व क्रीडा प्रकारात निपुण असणे खूप महत्त्वाचे आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने अनेक ग्रामस्थांमध्ये असलेल्या सुप्त गुणांची पारख होणार असल्याचे सांगितले.

Goa News|Festival
Mallikarjuna Temple: श्रीस्थळ श्री मल्लिकार्जुन देवाचा समुद्रस्नान सोहळा उत्साहात

महोत्सवातील पहिला उपक्रम असलेल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्‍घाटन क्रिकेटपटू तसेच आंतरराष्ट्रीय क्रिकेट पंच यशवंत बर्डे यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आले.

अर्जुन आरोसकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. तुळशीदास शिंदे यांनी आभार व्यक्त केले. प्रा. सुभाष कवठणकर यांनी सूत्रसंचालन व महोत्सवातील कार्यक्रमांची रूपरेषा सादर केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com