National Co-Operative Week: युवा वर्गासाठी मुख्यमंत्र्यांचे 'दिवाळी गिफ्ट', सहकार सप्ताहात केली 'ही' महत्वाची घोषणा

National Co-Operative Week गोव्यात आता सहकार क्षेत्रात डिग्री व डिप्लोमा प्रमाणपत्र कोर्स - मुख्यमंत्री
National Co-Operative Week
National Co-Operative WeekDainik Gomantak

National Co-Operative Week गोव्यात विविध सहकारी संस्थांनी पाच हजारावर लोक कामाला आहेत. पण गोव्यात सहकार क्षेत्रातील डिग्री किंवा डिप्लोमा थेट प्रमाणपत्र कोर्सची सोय नाही. राज्याबाहेर हे कोर्स करून प्रमाणपत्र मित्रवावे लागते.

त्यासाठी राज्य सरकारने शिक्षण खात्यामार्फत राज्यात परस्पर जरी असले तरी सहकार क्षेत्रातील डिग्री व डिप्लोमा कोर्सेसच्या परीक्षा घेऊन प्रमाणपत्र देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

दोन शैक्षणिक विद्यापिठांशीही बोलणी सुरू असून येणाऱ्या दोन तीन महिन्यात राज्यात सहकार क्षेत्रातील डिग्री व डिप्लोमा कोर्स सुरू होणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी रवींद्र भवनात केली.

National Co-Operative Week
Cylinder Blast: कारेमड्डीत घरगुती सिलिंडरचा स्फोट! साडेतीन लाखांचे नुकसान

सत्तराव्या राष्ट्रीय सहकार सप्ताहात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी सहकारमंत्री सुभाष शिरोडकर व इतरांची उपस्थिती होती. सहकार क्षेत्रात नवीन पिढीने यायला हवे. त्यासाठी त्यांना प्रोत्साहनाची गरज आहे.

आजपर्यंत सहकार क्षेत्र सांभाळून ठेवलेले लोक बुजुर्ग बनले आहेत. त्यामुळे नवीन विचार, संकल्पना या क्षेत्रात येऊन राज्याला आज आवश्यक असलेल्या व राज्य परराज्यावर अवलंबून असलेल्या अनेक जीवनावश्यक गोष्टी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उपलब्ध करून देऊ शकतात, असे आवाहनही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी केले. यावेळी सहकार क्षेत्रातील बुजुर्ग लोकांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला सहकार क्षेत्रातील विविध मान्यवर, विविध सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव, तसेच कर्मचारी उपस्थित होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com