Goa Narcotic Raid : म्हापशात सापळा रचत 1.2 किलो गांजासह एकाला अटक

विशिष्ट माहितीच्या आधारे म्हापसा पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी साईबाबा मंदिर कुचेली य़ेथे अमली पदार्थांवर छापा टाकून संतोष कांबळे (31) याला 1 लाख रुपये किमतीच्या 1.2 किलो गांजासह रंगेहात पकडले.
Goa Narcotic Raid
Goa Narcotic RaidDainik Gomantak

Goa Narcotic Raid : गोव्यात य़ेणारे पर्यटक इथे य़ेऊन ड्रग्जचा व्यवहार करताना दिसतात. दर एक-दोन दिवसांत या अशा घटना घडत असतात. महाराष्ट्रातील कोल्हापूर येथील मूळ रहिवासी असलेल्या एकाला म्हापसा पोलिसांनी शनिवारी 1 लाख रुपये किमतीच्या 1.2 किलो गांज्यासह अटक केली आहे.

विशिष्ट माहितीच्या आधारे म्हापसा पोलिसांच्या कर्मचार्‍यांनी साईबाबा मंदिर कुचेली य़ेथे अमली पदार्थांवर छापा टाकून संतोष कांबळे (31) याला 1 लाख रुपये किमतीच्या 1.2 किलो गांजासह रंगेहात पकडले.

Goa Narcotic Raid
Ration Shop News: ...अन्यथा फेब्रुवारीचा धान्याचा कोटा उचलणार नाही: रेशन दुकानमालकांचा सरकारला इशारा

पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम 20 (बी) (आय) (बी) अन्वये गुन्हा नोंदवला आहे.

छापा टाकणाऱ्या पथकाचे नेतृत्व म्हापसा पीआय परेश नाईक यांच्यासह पीएसआय सुनील पाटील, हेडकॉन्स्टेबल सुशांत चोपडेकर आणि पोलिस कॉन्स्टेबल राजेश कांदोळकर, प्रकाश पोळेकर, अक्षय पाटील, आनंद राठोड आणि तुकाराम कांबळी यांनी केले.

म्हापसा एसडीपीओ जिवबा दळवी आणि एसपी नॉर्थ निधीन वल्सन (आयपीएस) या कार्यक्रमाचे निरीक्षण करत होते. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

दरम्यान, कोलवाळ येथे चोरीची घटना उघडकीस आलीय. कोलवाळ समुद्रकिनारी चोरीची मोटार विकण्याचा प्रयत्न करताना चार तरुणांना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. या घटनेविषयी अशी माहिती प्राप्त झालीय की, काणकोण पोलीस ठाणाच्या हद्दीतून बोट चालवण्यासाठीची मोटार चोरीला गेल्याची घटना घडली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com