Goa Monsoon Updates: गोवेकरांना सतर्कतेचा इशारा

गोव्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला
Goa Monsoon Updates
Goa Monsoon UpdatesSandip Desai

पणजी: सोमवारी राज्यात (Goa) काही ठिकाणी दमदार तर काही ठिकाणी अगदीच तुरळक सरींनी हजेरी लावली. रात्री मात्र पावसाने जोर धरला होता. दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 याकाळात 18.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. मंगळवारीदेखील राज्यात ऑरेंज अलर्ट कायम आहे. काल सोमवारी दिवसभरात पर्जन्यप्रवण पेडणे, सत्तरी, वाळपई, साखळी याभागातही सुमार पाऊस झाला. सकाळी 8.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत म्हापसा येथे 30.0 मि. मी., जुने गोवा 20.5 मि. मी., पणजी 23.0 मि. मी., पेडणे 19.5 मि. मी., काणकोण 13.5 मि. मी. तर मुरगाव येथे 6.5 मि.मी. पावसाची नोंद झाली.बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. मात्र, त्याचा प्रभाव राज्यात व्हायला वेळ लागतो. त्यामुळेच दिवसभरात पावसाचा जोर नव्हता. पण मध्यरात्रीनंतर मंगळवारीदेखील राज्यात ऑरेंज अलर्ट कायम राहणार असून मुसळधार पाऊस होईल.

Goa Monsoon Updates
Goa Monsoon Updates: तीन दिवस ऑरेंज अलर्ट; मच्छीमारांना इशारा

केवळ दोन ‘कॉल’!

- एम. राहुल, वेधशाळा पणजीअग्निशामक दलाला सोमवारी दिवसभरात राज्यातून केवळ दोन ‘कॉल’ आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. खांडेपार आणि पणजी शहरात क्षुल्लक घटनांची नोंद झाली असून या घटनांत कोणतीच वित्त वा जीवितहानी झालेली नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com