Goa Monsoon Update: पावसाचा जोर कमी, पण पडझडीच्या घटना सुरूच; अग्निशमन दलाचे जवान ॲक्शन मोडमध्ये...

मुसळधार पावसामुळे शनिवारी चार ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्या
Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

Goa Monsoon Update: राज्यात मागील 2 दिवसात पावसाचा जोर काही प्रमाणात कमी झाला असला तरी पडझडीच्या घटना मात्र सुरूच आहेत. मुसळधार पावसामुळे शनिवारी चार ठिकाणी झाड कोसळल्याच्या घटना घडल्याची नोंद मडगाव अग्निशमन केंद्रात झाल्याची माहिती मडगाव अग्निशमन केंद्राचे अधिकारी हर्क्युलानो गिल सोझा यांनी दिली.

Goa Monsoon Update
Goa Crime News : खैराच्या झाडांच्या तस्करी प्रकरणी सिंधुदुर्गातील संशयिताला अटक; सात संशयित फरार

यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे. झळके-मडगाव येथे घडलेल्या पहिल्या घटनेत मोठे फणसाचे झाड रस्त्यावर पडून विजेच्या तारा तुटल्या. हे झाड हटवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना जवळपास दोन तास लागले.

झाड उन्मळून पडल्याची दुसरी घटना सकाळी 11.30 वाजता घडली. एका मोठ्या फणसाच्या झाडाची फांदी पडून ती नारळाच्या झाडावर पडली असताना विजेच्या तारांमध्ये अडकली. यामुळे विजेचा मात्र खोळंबा झाला.

तिसरी व चौथी घटना दुपारी घडली. झाडांच्या फांद्याही अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा कर्मचार्‍यांनी काढून टाकल्या.

दुसरीकडे, गोवा विधानसभेच्या आवारात मुख्य रस्त्यावर पावसामुळे एक झाड कोसळले होते. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांना घटनास्थळी बोलावण्यात आले आणि रस्ता मोकळा करण्यात आला.

पडझडीच्या वाढलेल्या या घटनांनी अग्निशमन दलाच्या जवानांची मोठ्या प्रमाणात कसरत होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com