Diwali 2022: 'या' वर्षी नरकासुरांना भिजविणार पाऊस!

Diwali 2022: गोव्यात परतीच्या पावसाने नागरिकांची चागंलीच तारांबळ उडवली आहे.
Diwali 2022 | Narkasur
Diwali 2022 | NarkasurDainik Gomantak
Published on
Updated on

Diwali 2022: राज्यात काल पुन्हा पावसाने हजेरी लावली. पणजीत सायंकाळी 4.15 वा.च्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. केवळ पंधरा मिनिटे बरसलेल्या पावसामुळे पणजीत अनेक ठिकाणी पाणी साचले. अचानक बरसलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली.

शनिवार तसेच रविवारी राज्यात तुरळक पावसाची शक्यता असून त्यानंतर पुढील पाच दिवस कोरडे वातावरण राहणार असल्याची शक्यता गोवा वेधशाळेने वर्तविली आहे. त्यामुळे रविवारी जर पाऊस बरसला तर नरकासुराच्या प्रतिमा भिजतील.

Diwali 2022 | Narkasur
Goa News: गोव्यातील श्री मल्लिकार्जुन देवालय जमीन आरक्षित!

पावसाचा परतीचा प्रवास

छत्तीसगड, ओडिशा व उत्तर बंगालच्या उपसागराच्या उर्वरित भागातून पावसाचा परतीचा प्रवास सुरू आहे. शनिवारपर्यंत तेलंगणा, किनारी आंध्र प्रदेश आणि मध्य बंगालच्या उपसागरातून परतीचा प्रवास सुरू होण्याची शक्यता आहे.

पुढील 48 तासांत गोव्यासहित संपूर्ण देशातून मॉन्सूनच्या परतीचा प्रवास संपुष्टात येईल. गोवा वेधशाळेचे वैज्ञानिक एम. राहुल यांच्या मते, येत्या दोन दिवसांत मॉन्सून परतेल. परतीचा प्रवास संपला म्हणजे येणाऱ्या काळात पाऊस बरसणारच नाही, असे नसते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com