Goa Monsoon 2023 : धावेत होतेय 38 वर्षांपासून नित्य पर्जन्यमापन

पावसाची नेमकी नोंद ; मिलिंद जोशींच्या छंदाची बनलीय परंपरा
Goa Monsoon 2023
Goa Monsoon 2023Dainik Gomantak

पद्माकर केळकर

नगरगाव सत्तरी पंचायत क्षेत्रातील धावे गावात राहत असलेल्या मिलिंद पांडुरंग जोशी यांनी वडिलांनी सुरू केलेली पाऊसमान मोजण्याची परंपरा अखंडितपणे आजही सुरूच ठेवली आहे. यंदाच्या मोसमात आतापर्यंत ४४ इंच पावसाची नोंद झालेली आहे. अनेकांकडून कुतूहलापोटी मिलिंद जोशी यांना रोज पाऊस किती झाला,याची विचारणा होते. सर्वांना तितक्याच अदबीने आणि औत्सुक्याने ते माहिती देतात.

गेली 38 वर्षे जोशी कुटुंबीय दरवर्षी पावसाची नोंद करून ठेवत आले आहेत. छंद म्हणून सुरू केलेले काम आज एक परंपरा म्हणून नावारुपाला आले आहे. मिलिंद यांचे वडील कै. पांडुरंग जोशी यांनी 1985 साली छंद म्हणून घरी काम सुरू केले होते. त्यांच्या निधनानंतर परंपरेची जपणूक सुपूत्र मिलिंद जोशी करीत आहेत. सुरूवातीला पावसाचे पाणी जमा करण्यासाठी बाटलीचा वापर केला जायचा.

Goa Monsoon 2023
Goa Theft Case : गोव्यातून 4 रेंट ए बाईक चोरल्याप्रकरणी कोल्हापूरचा अट्टल दुचाकी चोरटा गजाआड

आता खास मापाचे भांडे वापरले जाते आहे. सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत व रात्री 8 ते सकाळी 8 वाजेपर्यंत अशा बारा तासांच्या फरकाने भांड्यात जमा झालेले पाणी मोजून ठेवले जाते. पावसाची नोंद मि.मी. मध्ये केली जाते. या पर्जन्यमान मोजणे कामाचा उपयोग केवळ स्वत:लाच नव्हे तर समाजालाही उपयोग होतो आहे. या परंपरेच्या जोडीला मिलिंद जोशी यांच वडिलांच्या छंदावरील श्रध्देचा भागही मोठा म्हणावा लागेल.

Goa Monsoon 2023
Goa professional league : साळगावकर’च्या जागी कुठ्ठाळी व्हिलेजर्सची निवड

शुक्रवारपर्यंत 44 इंच पावसाची नोंद !

यंदा आज शुक्रवार 7 जुलै पर्यंत 44 इंच म्हणजेच 1,113 मी.मी. पावसाची नोंद झालेली आहे. 2015 साली 146 इंच, 2016 साली 152 इंच, 2017 साली 176 इंच, 2018 साली 184, 2019 साली 260 इंच, 2020 साली 233 इंच, 2021 साली 215 , 2022 साली 184 इंच एकूण पावसाची नोंद असल्याचे मिलिंद जोशी यांनी सांगितले. दरवर्षी जानेवारी ते डिसेंबर अशी ही नोंद ठेवली जाते

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com