Goa BJP: मडगावात भाजपचे पुन्हा मताधिक्य वाढणार!

Goa BJP: आगामी लोकसभा निवडणुकीत मडगावात भाजपचे मताधिक्य पुन्हा वाढेल.
Goa BJP
Goa BJPDainik Gomantak
Published on
Updated on

Goa BJP: मडगावात रविवारी झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्ता मेळाव्यात कॉंग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेले आमदार दिगंबर कामत यांनी कॉंग्रेसचे मडगाव गटाचे अध्यक्ष गोपाळ नाईक यांच्यासह 2500 कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला. कामत यांनी मडगावमधून 10 हजार सभासदांची नोंदणी करण्याचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी सांगितले.

कामत यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला सासष्टीसह दक्षिण गोव्यात फायदाच होईल, असे पक्षाध्यक्ष सदानंद शेट तानावडे (Sadanand Shet Tanawade) यांनी सांगितले. जर कामत यांनी आणखी 7500 सभासदांची नोंदणी केली, तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपचे मडगावातील मताधिक्य भरपूर वाढेल.

Goa BJP
Goa Zilla Panchayat Election : दवर्ली, रेईस मागूशमध्ये भाजप; तर कुठ्ठाळीत अपक्षाची बाजी

भारतीय जनता पक्षाच्या (BJP) कार्यपद्धतीप्रमाणे दर तीन वर्षांनी सभासद नोंदणी होत असते. 2012 पर्यंत जेव्हा चंदन नाईक मडगाव मंडळाचे अध्यक्ष होते, तेव्हा भाजपचे अंदाजे 10500 सभासद होते. 2014 सालच्या लोकसभा निवडणुकीत मडगावात भाजपने 1300 मतांची आघाडी घेतली होती. तेव्हा कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम करून ही आघाडी मिळवली होती.

भाजप सदस्य संख्या 20 हजारावर पोचणार

मंडळाचे अध्यक्ष रूपेश महात्मे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की मडगावात अंदाजे 11000 सभासद व 3000 कार्यकर्ते आहेत. कामत यांच्या कार्यकर्त्यांच्या समावेशाने सभासदांची संख्या 13500 तसेच आणखी 7500 सभासद झाले, तर सभासदांची संख्या 20 हजार पार करेल.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com