Goa Road Accident: म्हापसा बोडगेश्वर मंदिर येथे दुचाकी आणि खासगी बसमध्ये भीषण अपघात; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

Goa Road Accident:- पिल्लई हे आपली लेन सोडून चुकीच्या लेनमधून त्या भरधाव बसला मागाहून धडकले.
Goa Road Accident:
Goa Road Accident:

Goa Road Accident: म्हापसा बोडगेश्वर मंदिर येथे दुचाकी आणि एका खासगी बस मध्ये अपघात होऊन एकाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्रौ 8 च्या दरम्यान घडली आहे.

बिनू पिल्लई असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मल्याळम न्यूज चॅनेलचे रिपोर्टर असल्याचे समोर आले आहे. घटनास्थळी त्यांचे पत्रकारितेचे ओळखपत्र (ID Card) सापडले असून त्यावर ही सर्व माहिती नोंदवलेली आहे.

Goa Road Accident:
Ranji Trophy Cricket Tournament: गोव्याचा संघ साफ निष्प्रभ; संघावर फॉलोऑनचे सावट

घडलेल्या घटनेची मिळालेली प्राथमिक माहिती अशी की, म्हापसाहून मुंबई येथे जाणारी एक खासगी आराम बस (MH-47-y-6767) म्हापसा बोडगेश्वर मंदिरानजीक आल्यावर त्या बसमागून आपल्या ताब्यातील दुचाकी (GA 03-AJ-1102) घेऊन जाणारे पिल्लई हे आपली लेन सोडून चुकीच्या लेनमधून त्या भरधाव बसला मागाहून धडकले.

या धडकेत ते गंभीररीत्या जखमी झाले. त्यांना नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. बिनू पिल्लई हे 46 वर्षाचे असून त्यांच्या परिवाराबद्दल माहिती अद्याप हाती आली नाही. सविस्तर बातमी अपडेट करीत आहोत

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com