Goa Accident Cases: रस्‍त्‍यांची तोडफोड ठरतेय प्राणघातक!

Goa Accident Cases: वीजसमस्या कायमस्वरूपी सोडविण्‍याच्‍या उद्देशाने बहुतांश भागात भूमिगत वीजवाहिन्‍या घालण्‍याचे काम सुरु आहे.
Goa Accident Cases
Goa Accident CasesDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Accident Cases: वीजसमस्या कायमस्वरूपी सोडविण्‍याच्‍या उद्देशाने राज्‍याच्‍या बहुतांश भागात भूमिगत वीजवाहिन्‍या घालण्‍याचे काम सुरू आहे. पण त्‍यासाठी सर्वत्र रस्‍त्‍यांची तोडफोड करण्‍यात येत आहे. पेडणे तालुक्‍यातील मांद्रे मतदारसंघही त्‍यास अपवाद ठरलेला नाही.

विशेष म्‍हणजे खोदलेले चर तात्‍काळ बुजविणे गरजेचे आहे. पण ते तसेच ठेवण्‍यात येत असल्‍यामुळे अपघातांना निमंत्रण देणारे ठरत आहेत. अशाच खोदलेल्‍या चरामुळे चार दिवसांपूर्वी मांद्रेत एका नवविवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागला होता.

Goa Accident Cases
Goa News: शिवोलीत जोडरस्त्याचे काम लवकरच होणार- लोबो

राज्‍याच्‍या इतर भागांप्रमाणेच किनारी भागांतही भूमिगत वीजवाहिन्‍या घातल्‍या जात आहे. त्‍यामुळे सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले आहे. शिवाय बळींची संख्‍याही वाढत चालली आहे. याकडे सरकारच्‍या सार्वजनिक बांधकाम खात्‍याने त्वरित लक्ष देऊन रस्‍त्‍यांचे हॉटमिक्‍सिंग डांबरीकरण करण्‍याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

तसेच, या अपघातानंतर खडबडून जागे झालेल्‍या पंचायत मंडळाने घटनास्थळी धाव घेऊन या नादुरुस्‍त रस्‍त्‍यांची दुरुस्‍ती मांद्रेतील सप्ताहपूर्वी करावी, अन्‍यथा ग्रामस्थांना घेऊन रस्त्यावर उतरू, असा इशारा द्यावा लागला. तरीही कंत्राटदार किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याने या रस्त्यांकडे अजूनही लक्ष दिलेले नाही. परिणामी लहान-मोठे अपघात घडतच आहेत.

Goa Accident Cases
Sesa Workers in Goa : सेझा कामगारांना मोठा दिलासा; 'रिट्रेचमेंट' नोटिसीला स्थगिती

भूमिगत वीजवाहिन्‍या घालण्यासाठी 15 ऑगस्टपूर्वी काम पूर्ण करण्याची अट सरकारने जिल्हाधिकाऱ्यामार्फत कंत्राटदाराला घातली होती. परंतु कंत्राटदाराने वेळेत काम सुरू केले नाही. परिणामी ते वेळेत संपले नाही. गणेश चतुर्थीनंतर कामाला सुरूवात केली. काही ठिकाणी खड्डे बुजविण्‍यात आलेले आहेत, पण तेसुद्धा काम व्यवस्थित झालेले नाही.

ठिकठिकाणी रस्त्यावर मातीचे ढिगारे दिसून येतात. रस्‍त्‍यावर कोणत्‍याच ब्रकारचे दिशादर्शक फलक किंवा धोक्‍याची सूचना देणारे फलक नसल्‍याने अपघातांच्‍या संख्‍येत आणखी भर पडत आहे. रात्रीच्‍या वेळी तर हमखास अपघात घडतात.

तुये आयटीआय परिसरात जेथे खोदकाम करण्‍यात आलेले आहे, तेथे फलक लावलाय, परंतु रात्रीच्या वेळी तो दिसत नाही. वाहनांच्‍या प्रखर लाईट्‌समुळे समोरचा वाहनचालक गोंधळून जाण्याचे प्रकारही घडतात. याकडे सरकारने लक्ष देऊन आणि कंत्राटदाराने ज्या ठिकाणी खोदकाम केलेले आहे ती जागा सुरक्षित ठेवून तेथे रिफ्लेक्ट म्‍हणजेच चकाकणाऱ्या टेप लावाव्‍यात अशी मागणी केली जात आहे.

Goa Accident Cases
Goa Cashews Festival : गोव्यात काजू महोत्सवाचं होणार आयोजन

4 दिवसांपूर्वीच नवविवाहितेचा बळी

एखाद्या परिसरात खोदकाम केल्यानंतर, तसेच केबल घातल्‍यानंतर तेथील चर 24 तासांच्या आत बुजविणे बंधनकारक आहे. मात्र कंत्राटदार पंधरा-पंधरा दिवस खोदकाम तसेच ठेवतो. उलट कोणी प्रश्‍‍न विचारला तर उलटसुलट उत्तरे देतो.

तुये आयटीआय परिसरात वीजउपकेंद्रासमोर गेल्‍या कित्‍येक दिवसांपासून खोदकाम तसेच ठेवण्‍यात आलेले आहे. त्याचा परिणाम म्हणून मागच्या चार दिवसांपूर्वी आस्‍कावाडा-मांद्रे येथील एका दुचाकीस्वार 28 वर्षीय नवविवाहित महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. त्‍यानंतर या रस्‍त्‍याच्‍या कामाबाबत प्रश्‍‍नचिन्‍ह निर्माण होऊ लागले आहे.

जीत आरोलकर, आमदार-

रस्ते खणल्‍यानंतर चर योग्‍य पद्धतीने बुजविण्‍याची सूचना कंत्राटदाराला करण्‍यात आलेली आहे. सार्वजनिक बांधकाम खात्‍याने रस्‍त्‍यांच्‍या कामाकडे जातीने लक्ष ठेवायला पाहिजे. तसे झाले तरच अपघातांना आळा बसू शकतो.

अ‍ॅड. प्रसाद शहापूरकर, 'स्वराज'चे निमंत्रक-

सध्‍या आगरवाडा येथे चढणीवर प्रमुख मार्गावर केबल्स टाकण्यासाठी रस्त्याच्‍या बाजूला मोठमोठे चर खोदण्‍यात आलेले आहेत. त्‍यामुळे हा रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. आता संबंधित खात्‍याने आणखी बळी जाण्‍याची वाट पाहू नये.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com