Goa Kokani Academy : कोकणी अकादमीच्या वास्तू उद्‌घाटनचा मुहूर्त बदलला

सोहळ्याचा सायंकाळचा कार्यक्रम आता होणार सकाळी : कोकणी वर्तुळामध्ये सखेद आश्‍चर्य व्यक्त
Goa Kokani Academy
Goa Kokani Academy Dainik Gomantak

Goa Kokani Academy : कोकणी अकादमीचे उद्या 21 जून रोजी नव्या वास्तूत स्थलांतर होत असून त्यासाठी सायंकाळी 4 वाजता उद्‌घाटन सोहळा ठेवण्यात आला होता. मात्र आज ऐनवेळी हा मुहूर्त रद्द करून सकाळी 11 वाजता हे उद्‌घाटन ठेवण्यात आल्याने कोकणी वर्तुळात आश्चर्य आणि नाराजी व्यक्त केली जात आहे.

पणजी पाटो येथे असलेले अकादमीचे कार्यालय आता बीएसएनएल इमारतीत नेण्यात आले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते या कार्यालयाचे उद्‌घाटन होणार होते. मात्र मुख्यमंत्री उद्या संध्याकाळी गोव्याबाहेर जात असल्याने हे उद्‌घाटन आता सकाळी होणार आहे.

यासंबंधी कोकणी वर्तुळातून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आमंत्रण देणारे पत्रकसुद्धा राजभाषा संचलनालयाने कोकणी भाषेतून जारी केलेली नाही अशी खंत पत्रकार संदेश प्रभुदेसाई यांनी आपल्या गोवा न्यूज डॉट कॉम या संकेतस्थळावर म्हटले आहे.

Goa Kokani Academy
World Music Day: म्युझिक ऐकण्याचे 'हे' फायदे तुम्हाला ठेवतील एकदम फिट

दरम्यान, हा कार्यक्रम 23 जून रोजी, ज्या दिवशी शणै गोंयबाब जयंती आहे त्या दिवशी ठेवणे संयुक्तिक होते. हा कार्यक्रम 21 जून ठेवण्यामागे मुख्यमंत्री सावंत यांना हवी असलेली वेळ हेच मुख्य कारण असावे, असे मत ज्येष्ठ कोकणी नेते उदय भेंब्रे यांनी व्यक्त केले.

कोकणी अकादमीला नवी वास्तू दिली हे चांगले झाले. पण या अकादमीला सरकार पुरेसा निधी देत नाही आणि अकादमीकडे कर्मचारीही नाहीत. त्यामुळे ही अकादमी काम कसे करेल असा प्रश्न भेंब्रे यांनी केला.

Goa Kokani Academy
International Yoga Day: योग दिनाच्या शुभेच्छा देत शिल्पा म्हणाली...पाहा Video

कोकणी अकादमीतर्फे दिले जाणारे पुरस्कार बंद करण्यात आले. राजभाषा संचालनालय सुस्त झोपले आहे. कोकणी पुत्रांना प्राप्त व्हायच्या असलेल्या नोकऱ्या दुसऱ्यांना देण्याचे चालले आहे आणि अशा परिस्थितीत कुणी आवाज काढत नाहीत. कोकणी चळवळ सत्ताधाऱ्यांसमोर लाचार झाली असल्याने हे सारे होत आहे का असा सवाल प्रभुदेसाई यांनी आपल्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केलेल्या बातमीत केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com