Goa Janta Darbar : जनतेच्या किरकोळ समस्या त्वरित सोडवा : मंत्री हळर्णकर

आज काणकोणात मत्स्योद्योग खात्याचे मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांचा जनता दरबार भरविण्यात आला होता.
Goa Janta Darbar
Goa Janta DarbarDainik Gomantak

Goa Janta Darbar : काणकोण, काणकोणात आतापर्यंत चार जनता दरबार झाले असून किरकोळ समस्याच जनता दरबारात पुन्हा पुन्हा उपस्थित का होतात? अशा समस्या संबंधित अधिकाऱ्यांनी आपल्या पातळीवर त्वरित सोडवाव्या, असे मत्स्योद्योग मंत्री नीळकंठ हळर्णकर यांनी काणकोणात सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगितले.

आज काणकोणात मत्स्योद्योग खात्याचे मंत्री नीळकंठ हर्ळणकर यांचा जनता दरबार भरविण्यात आला होता. या जनता दरबारात भाजपप्रणित काणकोण पालिकेचे नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर, खोतीगाव पंचायतीचे सरपंच आनंदु देसाई यांनी वेगवेगळ्या समस्या मांडून सरकारी अधिकाऱ्यांना कानपिचक्या दिल्या.

त्यांच्या जोडीलाच भाजपच्या राज्य कार्यकारिणीचे सचिव सर्वानंद भगत यांनी जलस्रोत, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ते विभागाने व्यवस्थित काम करण्याची शिफारस केली. त्याला जोड भाजपचे काणकोण मतदारसंघ मंडळ अध्यक्ष विशाल देसाई यांनी दिली.

दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी दीपक देसाई, काणकोणचे उपजिल्हाधिकारी रमेश गावकर, मामलेदार मनोज कोरगावकर, नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर उपस्थित होते. या जनता दरबारात वेगवेगळ्या नागरिकांनी वेगवेगळ्या समस्यांची जंत्रीच मंत्र्यांना ऐकवली.

सर्वाधिक समस्या काणकोण सामाजिक आरोग्य केंद्र, सार्वजनिक बांधकाम खाते व जलस्रोत खात्याच्या संदर्भात होत्या.

डायगो डिसिल्वा यांनी काणकोण आरोग्य केंद्रात डॉक्टर उशिरा येतात, काही वेळा येतच नसल्याने तपासणीस आलेल्या नागरिकांची कुचंबणा होत आहे. त्याशिवाय आरोग्य केंद्रात ‘क्ष किरण यंत्र’ असूनही तंत्रज्ञ उपलब्ध नसल्याने रुग्णांना जिल्हा इस्पितळ किंवा खासगी रुग्णालयातून ‘क्ष-किरण’ तपासणी करण्याचा सल्ला दिला जात आहे.

या या केंद्रात नियमित हजेरीसाठी बायोमेट्रिक यंत्र बसविण्याची मागणी त्यांनी केली.

Goa Janta Darbar
Goa News: साकोर्डा पंचायत इमारतीच्‍या कामाला ‘ग्रहण’

नगराध्यक्ष रमाकांत नाईक गावकर यांनी चार रस्ता ते मनोहर पर्रीकर बायपास रस्ता अरुंद असून या रस्त्याच्या रुंदीकरणासाठी मागणी करूनही बांधकाम खाते दुर्लक्ष करीत असल्याचे सांगितले.

यासंदर्भात सभापती तवडकर यांनी या रस्त्याच्या कडेला असलेल्या जमीन मालकांशी चर्चा करून यावर तोडगा काढण्याचे ठरविल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

जेटीची दुरुस्ती करा

पैंगीणचे माजी पंच रूद्रेश नमशीकर यांनी तळपण जेटीची दुरुस्ती १९८८ मध्ये करण्यात आली होती. सध्या जेटी मोडकळीस आली आहे, त्यासाठी त्वरित या जेटीची दुरुस्ती व तळपण नदीचे मुखाकडील पात्र गाळमुक्त करण्याची मागणी केली.

त्यावेळी मंत्री हळर्णकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. निवृत्त मुख्याध्यापक शांताजी नाईक गावकर यांनी भटकी कुत्री व गुरे यांची समस्या काणकोण तालुक्याला भेडसावत असल्याची कैफियत मांडली.

त्यावेळी भटक्या गुरांना गोशाळेत पाठविण्यापासून गोशाळा उभारण्यास व त्यांच्या पालन पोषणासाठी सरकार मदत देत असल्याचे सांगितले.

स्वच्छ पाणी द्या

विहिरीत भरपूर पाणी उपलब्ध असताना नडके भागात गढूळ पाणी पुरवले जाते. याला या खात्याचे जेष्ठ अभियंता जबाबदार आहेत, अशी माहिती व्हिडिओद्वारे खोतिगावचे सरपंच आनंदू देसाई यांनी दिली.

या संदर्भात अधिकारी एलिस्टर फर्नांडिस म्हणाले, ही विहीर खाजगी असून विहीर मालकाने विरोध केल्यामुळे त्या विहिरीचे पाणी बंद केले आहे. मंत्री हळर्णकर यांनी या विषयावर गांभीर्याने दोघांचे म्हणणे ऐकून घेतले.

गढूळ पाणी वितरण करता कामा नये. नागरिकांना स्वच्छ पाणी वितरित करण्याचा आदेश मंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com