Vanguards of Our Shores: Lighthouses and Testaments of India's Past and Present
Vanguards of Our Shores: Lighthouses and Testaments of India's Past and PresentDainik Gomantak

Water Transport In India: भारतीय जलमार्गांचा वैभवशाली इतिहास अतिप्राचिन, मात्र विकास अनिवार्य

प्रा. वसंत शिंदे : संवर्धनासह पर्यटनाच्या विकासासाठी उपयोग व्हावा

Water Transport In India देशावर परकीय आक्रमणापूर्वी, वसाहतवादी देशात येण्यापूर्वी भारतात समृद्ध जलमार्ग व्यवस्था होती. ती अगदी इसवी सनापूर्वी असल्याचे पुरावे सापडत असल्याची माहिती प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्त्व शास्त्रज्ञ प्रा. वसंत शिंदे यांनी दिली आहे.

केंद्रीय बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग मंत्रालय, केंद्रीय दीपगृह महासंचालनालय यांच्या वतीने देशाचा पहिला दीपगृह महोत्सव सुरू आहे.

यात भारत प्रवाह या इन्स्टिट्यूट फॉर गव्हर्नन्स, पॉलिसी अँड पॉलिटिक्सच्या पुढाकाराने आयोजित ''व्हॅनगार्ड्स ऑफ अवर शोर्स: लाइटहाऊस अँड टेस्टामेंट्स ऑफ इंडियाज पास्ट अँड प्रेझेंट'' या सत्राचे आयोजन कांदोळी येथे करण्यात आले होते.

यात प्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्वशास्त्रज्ञ राखीगढी फेम प्रा. वसंत शिंदे , सागरी पुरातत्वशास्त्रज्ञ आणि प्रधानमंत्री संग्रहालय नवी दिल्लीचे विशेष अधिकारी डॉ. सुनील गुप्ता, गोवा राज्य वस्तुसंग्रहालयाचे संचालक डॉ. वासू उसपकर यांनी भाग घेतला.

खात्याच्या संयुक्त सचिव सर्वानन यांनी लाइटहाऊस हेरिटेज पर्यटन विकासाकडे मंत्रालयाचा दृष्टिकोन आणि या टप्प्यातील ७५ दीपगृहामधील गुंतवणुकीच्या संधींबाबत सादरीकरण केले.

वसाहतवादी येण्यापूर्वी वापर

प्रा. वसंत शिंदे यांनी भारताच्या सागरी इतिहासातील दीपगृहांचे ऐतिहासिक महत्त्व सांगत भारतात वसाहतवादी येण्यापूर्वी देशांतर्गत आणि सागरी जलमार्गांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याचे होता, त्याचे अनेक पुरावे आता सापडत आहेत.

गुजरात मधील लोथन येतील सापडलेले शिपयार्ड हे केवळ आशिया खंडातील सर्वात जुने नसून ते युरोपियन सागरी इतिहासापेक्षा जुने आहे, असे स्पष्ट केले.

जलमार्गांचा विकास अनिवार्य

डॉ. गुप्ता यांनी भारताचा सध्याचा जलमार्ग आणि सागरी मार्गांचा इतिहास सांगत एकूणच दळणवळणाच्या क्षेत्रात जलमार्गाला अत्यंत महत्त्व असल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे देशाला लाभलेला सागरी वारसा जपत नव्या जलमार्गांचा विकास अनिवार्य आहे, असे ते म्हणाले.

काही ठिकाणी स्थानिकांकडून होणारा विरोध आणि अनाठायी असल्याचे सांगताना जलमार्ग आर्थिक दृष्ट्या अत्यंत कमी खर्चिक असल्याचे डॉ. गुप्ता यांनी सांगितले. वासू उसपकर यांनी गोव्यातील जलमार्गाचा इतिहास सांगितला.

Vanguards of Our Shores: Lighthouses and Testaments of India's Past and Present
Panaji Dengue Cases: सावधान! पणजीत वाढताहेत डेंग्यूचे रुग्ण; खबरदारी घेण्याचे आवाहन

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com