इतर राज्यांच्या तुलनेत गोव्याचा विकासदर सर्वोत्कृष्ट : मुख्यमंत्री

Goa has the best Growth rate as compared to other states in India said CM Pramod Sawant
Goa has the best Growth rate as compared to other states in India said CM Pramod Sawant

पणजी : गोवा राज्य साधनसुविधा आणि विकासकामांच्या बाबतीत इतर राज्‍यांच्‍या तुलनेत आघाडीवर आहे. कोरोनासारखा कठीण काळ असूनही आम्ही आमच्या प्रगतीचा मार्ग अविरत ठेवण्याचा प्रयत्न केल्‍याची माहिती मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांनी दिली. ‘एएसएसओसीएचएएम’ फाउंडेशन आठवडा कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आत्मनिर्भर भारत हे ध्येय साध्‍य करण्यासाठीच्या आराखड्याची चर्चा करण्यात आली. अनेक प्रकारच्या योजना आणि विकास आराखड्याबद्दल चर्चा तसेच विचारविनिमय या चर्चेदरम्यान झाला. यावेळी हिरानंदानी समूहाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. निरंजन हिरानंदानी, ट्रान्सपोर्ट को-ऑपरेशन ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक विनीत अग्रवाल, एएसएसओसीएचएएमचे अध्यक्ष मगिरीश पै रायकर आणि अन्‍य मान्यवर यावेळी उपस्थित होते. 


गोव्यामध्ये मोबाईल रेंज आणि वीज ही खेडोपाड्यात पोहोचलेली आहे. आमच्याकडे आंतरराष्ट्रीय विमानतळ असल्याने जगाच्या नकाशावर पर्यटनाच्या बाबतीत आमची ओळख मोठी आहे. आम्ही सध्या आयटी आणि स्टार्टअपच्या बाबतीत खूप प्रयत्नरत आहोत. आमच्या राज्यातील अनेक तरुण क्षेत्राकडे वळत आहेत. शिवाय अनेक राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार याबाबतची गुंतवणूक करण्यासाठी तयार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाच्या बाबतीत आमचा रिकव्हरी रेट अतिशय चांगल्या प्रकारचा आहे. कोरोनाबाबतची परिस्थिती लवकरात लवकर सुधारण्याचा आणि मृत्यूदर घटविण्यासाठी आम्ही प्रयत्न केला आहे. राज्यातील कोरोनाबाबतची परिस्थिती आता खूपच चांगली आहे. अनेकांच्या नोकऱ्या या कालावधीत गेल्या, तर त्यादृष्टीने नोकरी निर्मितीच्या बाबतीत खूप प्रयत्न सुरू आहेत. कोरोनाच्या कालावधीत मंदावलेले पर्यटन आता जोर धरू लागले असल्याची माहितीसुद्धा  मुख्यमंत्री सावंत यांनी दिली.

अधिक वाचा :

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com