LED Fishing in Goa : एलईडी मासेमारीकडे अहवालानंतरही सरकारचे दुर्लक्ष!

उल्लंघन करणाऱ्यांवर मच्छीमार खात्याकडून कारवाई नाही
LED fishing
LED fishingDainik Gomantak

LED Fishing in Goa : मासेमारी हंगामाच्या सुरवातीला एलईडी मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर आणि बोटींच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचे विधान मच्छीमारमंत्र्यांनी केले होते, परंतु मच्छीमार खात्याला एलईडी मासेमारी होत असल्याचा अहवाल पुराव्यासह पाठवूनही मच्छीमार खात्याकडून दुर्लक्ष केले जात आहे.

किनारी पोलिसांनी एलईडी मासेमारी झाल्याच्या एकूण 30 तक्रारी मच्छीमार खात्याला सादर केल्या होत्या, परंतु आजपर्यंत खात्याकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. पोलिसांनी ठोस पुराव्यांसह या तक्रारी मच्छीमार खात्याकडे दिल्या होत्या. मासेमारी हंगामाच्या सुरवातीला एलईडी मासेमारी झाल्याचे अहवाल तयार करण्यात आले होते. त्यात ट्रॉलरकडून करण्यात आलेले उल्लंघनांचा स्पष्ट उल्लेख केले आहे, अशी माहिती किनारी पोलिस उपअधीक्षक संतोष देसाई यांनी दिली आहे.

LED fishing
Yuri Alemao : राहुल गांधींचे भारतमातेशी रक्ताचे नाते; युरींनी ठणकावलं

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 अहवालांत सुमारे 90 ट्रॉलर सापडले आहेत, जे एलईडी मासेमारी करतात. त्यात अनेकांचे विमा, समुद्र पात्रतता प्रमाणपत्र कालबाह्य झाले आहे. ट्रॉलरवर काम करणाऱ्या कामगारांकडे वैध ओळख प्रमाणपत्र आणि आधारकार्ड देखील नव्हते. त्यात मच्छीमारमंत्र्यांनी संबंधित प्राधिकरणाकडून ट्रॉलरवरील जनरेटरचा वापर होत असल्याच्या गोष्टीची पुष्टी झाल्याशिवाय कारवाई करता येत नसल्याचे सांगितले आहे.

दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने एलईडी मासेमारीवर कारवाई करण्याचे निर्देश मच्छीमार खात्याला दिले आहेत. खात्याकडून खंडपीठाच्या निर्देशांचे उल्लंघन केले जात असून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कायदा मोडणाऱ्यावर कठोर करवाई होणे आवश्‍यक आहे, परंतु येथे मच्छीमार खात्याचे अधिकारी कोनाडोळा करत आहेत असा आरोप गोंयच्या रापणकारांचो एकवोट संघटनेचे सचिव ओलानसियो सिमॉईश यांनी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com