Goa News : नारी शक्तीला उच्च स्थान : पल्लवी धेंपे

Goa News : भाजपचा जाहीरनामा विकासासाठीच, कुडचडेत दौरा
Goa
Goa Dainik Gomantak

कुडचडे, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकाळात केंद्राच्या साह्याने राज्यात अनेक साधनसुविधा, विकास प्रकल्प तसेच लोकांसाठी योजना राबवल्या जात आहेत.

राज्यातील ५ लाख नागरिकांना मोफत रेशन, ज्येष्ठ नागरिकांना मोफत विमा, महिलांच्या आरोग्यासाठी विशेष योजना तसेच युवांसाठी कौशल्य आणि मुद्रा योजनासारख्या योजना भाजपा राबवत आहे.

नारी शक्तीला भाजपच्या जाहीरनाम्यात उच्च स्थान आहे. त्यामुळे महिला सशक्तीकरणाला मोठा वाव आहे, असे भाजपाच्या महिला उमेदवार धेंपो यांनी सांगितले. त्या कुडचडे मतदार संघ दाैऱ्यात बोलत होत्या.

Goa
Kolhapur-Goa: कोल्हापूरच्या महिलेने पोटच्या मुलीला एक लाख रुपयांना गोव्यात विकले, नोटरीद्वारे झाला व्यव्हार

यावेळी कुडचडेचे आमदार नीलेश काब्राल यांनी भाजप उमेदवाराला निवडून द्यावे, असे आवाहन केले. ते म्हणाले, राज्य सरकारच्या अखत्यारित येणारे विषय हाताळण्यासाठी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत समर्थ आहेत.

केंद्र सरकारच्या अखत्यारित येणारे दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघातील विकासकामांचे मुद्दे लोकसभेत मांडण्यासाठी आज आपल्याला एक सुशिक्षित महिला उमेदवार लाभली आहे. त्याचा लाभ गोव्यातील जनतेला निश्चितपणे होणार आहे.

दरम्यान, यावेळी जिल्हा पंचायत अध्यक्ष सौ. सुवर्णा तेंडुलकर, जिल्हा पंचायत सदस्य श्री. सिद्धार्थ गावस देसाई, भाजपाचे प्रभारी श्री. सुरेश केपेकर, कुडचडे पालिकेचे नगराध्यक्ष श्री. प्रदीप नाईक, उपनगराध्यक्ष रुचा वस्त, नगरसेवक श्री. प्रमोद नाईक, श्री. दामोदर भेंडे, सौ. क्लेमेंटिना फर्नांडिस, सौ. जास्मीन ब्रागांझा,

श्री. टोनी कुतिन्हो, सौ. योलांडा परेरा, सौ. रिमा फर्नांडिस, सौ. कार्मेलिना मोराईस, श्री. विश्वास सावंत देसाई, असोल्डा पंचायतीचे सरपंच श्री. कुस्तोदियो फर्नांडिस, उपसरपंच दीपश्री नाईक, श्री. कायतान फर्नांडिस, सौ. पर्पेच्युअल फर्नांडिस, श्री. अँथनी फर्नांडिस, सौ. वासंती नाईक, सौ. मिलाग्रीन मोराईस,

शेल्डे पंचायतीच्या सरपंच सौ. कविता गावस देसाई, उपसरपंच श्री. प्रमोद देसाई, पंचसदस्य श्री. चेतन देसाई, सौ. मिलाग्रीना मिनेझीस, श्री. कायतान कार्व्हालो, सौ. दीप्ती नाईक, सौ. मिनाक्षी चिमुलकर, सौ. मारिया मास्कारेन्हास, सौ. लिओकाडिया लेंडिस यांची उपस्थिती होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com