हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे दीपोत्सव

उत्सव, सण साजरे करताना आपल्या परंपरेला विसरता कामा नये; कीर्तनकार मुकुंद कवठणकर
Goa हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे दीपोत्सव
Goa हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे दीपोत्सवDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: आपला भारत (India) हा संस्कृतीप्रधान (Culture oriented) देश आहे. देशाला वैभवशाली परंपरा आहे. व्यक्तिगत जीवनात प्रत्येकाचे मार्ग जरी वेगळे असले, तरी देशाची वैभवशाली परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे पुढाकार घ्यायला हवा. उत्सव, सण साजरे करताना आपल्या परंपरेला विसरता कामा नये. असे मत (Goa) कीर्तनकार मुकुंद कवठणकर यांनी व्यक्त केले. विशाल आणि समृद्ध हिंदू संस्कृतीचे जतन व्हावे.

Goa हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे दीपोत्सव
उत्तर भारतीयांचा प्रमुख सण "छटपूजा"

या उद्धेशाने, हिंदू राष्ट्र संघटनेतर्फे येथील छत्रपती शिवाजी महाराज सर्कलवरील छत्रपती शिवरायांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आयोजित 'दीपोत्सव' कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ते बोलत होते. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांचे आचारविचार प्रत्येकाने आचरणात आणावे. असे आवाहनही श्री. कवठणकर यांनी केले. यावेळी विजय होबळे यांनी आपले विचार मांडले.

मंगळवारी रात्री शिवाजी महाराज सर्कल आणि जुन्या बसस्थानकावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ छत्रपती शिवरायांचा जयघोष करीत आणि पणत्या प्रज्वलीत करून राष्ट्रप्रेमी नागरिकांतर्फे दीपोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मंदार गावडे, शेखर नाईक, राहूल धोंड, गोविंद साखळकर, आनंद गाड, शैलेश जाधव

शेखर नाईक, संजू नाईक, तुषार मांद्रेकर प्रभाकर कारंडे. संदेश सराफ,ओम होबळे, रामचंद्र पळ, बनेश. प्रदीप आदी राष्ट्रप्रेमी दीपोत्सवात सहभागी झाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com