Goa Mining: ट्रकचालक कर्जबाजारी, खाण कामगारांवर उपासमारीची वेळ; धारबांदोड्यातील विदारक स्थिती समोर

Goa Mining: बंद खाणींचा सर्वाधिक फटका
Goa Mining
Goa MiningDainik Gomantak

Goa Mining: राज्यातील खाण उद्योग बंद झाल्यास आज तेरा वर्षे पूर्ण झाली. त्‍याचा सर्वाधिक फटका धारबांदोडा तालुक्याला बसला. या तालुक्यातील कार्यरत खाणी बंद पडल्‍या.

त्यामुळे ट्रकचालक, खाण कंपन्यांमध्‍ये कामावर असलेले कामगार तसेच या व्यवसायाशी निगडित अन्य व्यावसायिकांच्या रोजीरोटीवर विपरित परिणाम झाला.

अजूनही खाणी नियमित सुरू झालेल्या नाहीत. त्‍यामुळे या खाण अवलंबितांनी अनेक उद्योगांकडे आपला मोर्चा वळविला आहे.

Goa Mining
Goa Accident: कदंब पठारावर भरधाव गाडीच्या धडकेत तरुण ठार

धारबांदोडा तालुका हा पूर्वी कृषीप्रधान प्रदेश होता. नंतरच्या काळात तेथे खाणी सुरू झाल्या. त्यामुळे खनिज खाणीशी संबंधित उद्योगांवरच विसंबून राहण्याची भिस्त वाढली. हजारो लोक खाण उद्योगाशी जोडले गेले.

या लोकांनी बऱ्यापैकी पैसाही कमावला. पण एका रात्रीत म्हणाव्या तशा खाणी बंद झाल्या आणि अचानक रोजीरोटीचा फटका येथील लोकांना बसला.

नंतरच्या काळात खाण कंपन्यांतील लिलावाचा खनिजमाल तेवढा वाहतूक करण्यात आला. खाणी बंद होण्यापूर्वी जो खनिजमाल उत्खनन केला होता, त्याची वाहतूक ई-लिलाव पद्धतीने करण्यात आली.

अजूनही बऱ्याच ठिकाणी खनिजमाल पडून आहे, तो नजीकच्या काळात उचलला केला जाणार आहे. पण मुख्य म्हणजे नियमित खाणी काही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या धारबांदोडा तालुका मागासच राहिला आहे.

दरम्‍यान, आता हळूहळू धारबांदोडा तालुका सावरत असला तरी ज्याप्रमाणे पूर्वी खाण उद्योग सुरू होता, त्याप्रमाणे आर्थिक आमदनी काही पुन्हा होणार नाही, हे मात्र पूर्ण सत्य असल्याच्या प्रतिक्रिया धारबांदोडावासीयांकडून व्यक्त होत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com