Goa Culture : बोर्डे-डिचोलीतील होमकुंड उत्सवाला भाविकांची गर्दी

भक्तगणांसह श्रींचे अग्नीदिव्य
Goa Culture
Goa CultureDainik Gomantak

Goa Culture : शेकडो भाविकांच्या साक्षीत आणि भक्तीमय वातावरणात बोर्डे-डिचोली येथील प्रसिद्ध "होमकुंड" उत्सव बुधवारी (ता.9) मध्यरात्री मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. श्री वडेश्वर देवाच्या प्रांगणात हा उत्सव पार पडला. बुधवारी रात्री श्रींचा कलश मंदिराबाहेर काढण्यात आल्यानंतर होमकुंड पेटविण्यात आले.

Goa Culture
Heat Wave In Goa: काळजी घ्या! राज्यात आज उष्णतेच्या लाटेच्या इशारा

नंतर वाजतगाजत देवीच्या कलशासह व्रतस्थ भक्तगण गावतड येथील पवित्र झरीवर जाऊन त्याठिकाणी स्नान करून पुन्हा वाजतगाजत होमकुंडस्थळी आले. होमकुंडस्थळी आल्यानंतर मध्यरात्री पारंपरिक कार्यक्रमांनुसार श्रीं च्या कलशासहित व्रतस्थ भक्तगणांनी "पुंडलिक वरदे हरी विठ्ठल" आदी देवदेवतांचा जयघोष करीत रखरखत्या होमकुंडातून अग्निदिव्य केले.

श्रींचा कळस माथ्यावर घेऊन अवसारी मोडानेही अग्नीदिव्य केले. होमकुंड उत्सवावेळी अग्नीदिव्य पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com