मांडवी नदीत 'गळ' टाकत काँग्रेसचे भाजप सरकारवर जोरदार ताशेरे

विधानसभा निवडणूक तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून नवनव्या युक्त्या आणि क्लृप्त्या लढविल्‍या जात आहेत.
Goa Congress attacks on BJP government
Goa Congress attacks on BJP government Dainik Gomantak

विधानसभा निवडणूक (Goa Assembly Election) तोंडावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे विविध राजकीय पक्षांकडून नवनव्या युक्त्या आणि क्लृप्त्या लढविल्‍या जात आहेत. काँग्रेस (Congress) पक्षही आता हळूहळू सरसावू लागला आहे. काल रविवारचा मौका साधून काँग्रेसने मांडवीच्‍या तीरावर (Mandovi River) ‘मासेमार’ बोलवले आणि लगेच नदीत गळ टाकले. मग म्हादई आठवली, तिचे प्रदूषण आठवले, मांडवीतले प्लास्टिकही आठवले. या साऱ्यांची गोळा-बेरीज करीत काँग्रेसच्या नेत्यांनी दणदणीत भाषणेही ठोकली आणि सरकारच्‍या कारभारावर ताशेरे ओढले. (Goa Congress attacks on BJP government)

गळ टाकून मासे पकडण्‍याची स्पर्धा केवळ औपचारिकता होती. सरकारने म्हादईनंतर मांडवीचे सुरू केलेले प्रदूषण हे येणाऱ्या काळात घातक रसायनच बनणार आहे, असा घोषवारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी आपल्या भाषणात चालवला. मांडवी नदीच्‍या तीरावर युवा काँग्रेसने घेतलेल्या या स्पर्धेचा पुरेपूर फायदा उठवत पक्षाच्‍या नेत्यांनी सरकारवर मांडवी दूषित केल्याचा आरोप केला. मासे पकडताना स्पर्धकांना मासे सापडण्याऐवजी प्लास्टिकच अधिक गळाला लागल्याचा आरोप चोडणकर यांनी केला. या प्रकाराला सर्वस्वी भाजप सरकारच जबाबदार असल्याचेही ते म्हणाले.

Goa Congress attacks on BJP government
Goa Election: गोव्यात ‘आप’ चा घरोघरी प्रचार

यावेळी युवा काँग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर, पणजीचे माजी महापौर उदय मडकईकर, काणकोणचे जनार्दन भंडारी, गोपी नाईक, शंकर किर्लपालकर आदी उपस्थित होते.

दरम्‍यान, या स्‍पर्धेत हितेश धुरी (प्रथम), एडिसन फर्नांडिस (द्वितीय), व्‍हेलेंटाईन रॉड्रिगीस (तृतीय) यांनी अनुक्रमे बक्षिसे मिळविली. सर्वाधिक मासे पकडणे प्रकारात शंकर मेस्त्री, रॉबर्ट डिसोझा यांना तर सर्वांत लहान मासा पकडणे प्रकारात दीपराज नाईक यांना बक्षीस मिळाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com