गोव्यासाठी गौरवाची बाब! जागतिक स्तरावरील प्रभावशाली शास्त्रज्ञांच्या यादीत डॉ. शैलेंद्र गुरव

Goa News: आयआयटी आणि एनआयटी- गोवाशी संबंधित असलेले वरदकांत मिश्रा, अभिषेक गुप्ता, सुबुधी विद्याधर, धीरेंद्र बहादूर आणि दामोदर रेड्डी यांचाही शास्त्रज्ञांच्या या यादीत समावेश आहे. मात्र डॉ. शैलेंद्र गुरव हे गोवा विद्यापीठाशी संबंधित असलेले एकमेव शास्त्रज्ञ या यादीत समाविष्ट आहेत.
Goa News: आयआयटी आणि एनआयटी- गोवाशी संबंधित असलेले वरदकांत मिश्रा, अभिषेक गुप्ता, सुबुधी विद्याधर, धीरेंद्र बहादूर आणि दामोदर रेड्डी यांचाही शास्त्रज्ञांच्या या यादीत समावेश आहे. मात्र डॉ. शैलेंद्र गुरव हे गोवा विद्यापीठाशी संबंधित असलेले एकमेव शास्त्रज्ञ या यादीत समाविष्ट आहेत.
Dr Shailendra Gurav, GoaDainik Gomantak
Published on
Updated on

यूएसए मधील स्टॅनफोर्ड विद्यापीठाने (Stanford University) १७ सप्टेंबर रोजी एक यादी जारी केली ज्यामध्ये २२ वैज्ञानिक क्षेत्रे आणि १७४ उपक्षेत्रांचा आणि त्यात काम केलेल्या वैज्ञानिकांच्या नावांचा समावेश होता. गौरवाची बाब म्हणजे विषयवार केल्या गेलेल्या या विश्लेषणात पहिल्या 2% जागतिक स्तरावरील प्रभावशाली शास्त्रज्ञांमध्ये गोवा कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये अध्यापन करणारे डॉ. शैलेंद्र गुरव यांनी स्थान मिळवले आहे.

डॉ. जॉन लॉन्निडीस यांच्या नेतृत्वाखाली शास्त्रज्ञाच्या चमूने ही यादी तयार केली आहे. शास्त्रज्ञांचे हे मूल्यांकन 'स्कॉर्पस'मधील उद्धरणांच्या आणि डेटाच्या आधारावर केले जात असते. स्टॅनफोर्ड वि‌द्यापीठाच्या रैंकिंगमध्ये मानकीकृत संदर्भ मैट्रिक्स, एच- इंडेक्स, सहलेखकत्व आणि एक संयुक्त निर्देशक यावर आधारित जगातील शीर्ष शास्त्रजांची ओळख पटवली जाते ज्यामुळे जागतिक स्तरावरील प्रभावशाली संशोधकांचे कार्य कळून येते.

१२५ पेक्षा अधिक संशोधन प्रकाशने, मंजूर झालेले ८ पेटंट्स (५ भारतीय, 3 आंतरराष्ट्रीय), मान्यता मिळवण्याच्या प्रतीक्षेत असलेले ११ पेटंट अर्ज, आंतरराष्ट्रीय प्रकाशकाकडून प्रसिद्ध झालेली ४ पुस्तके आणि इतर पुस्तकांतील १६ प्रकरणे यांचे डॉ. शैलेंद्र गुरव मानकरी आहेत. पदव्युत्तर अभ्यासक्रम करत असलेल्या तसेच पीएचडीसाठी संशोधन करणाऱ्या  अनेक विद्यार्थ्यांना त्यांनी आजवर मार्गदर्शन केले आहे. हर्बल नॅनो टेक्नॉलॉजी, नैसर्गिक उत्पादने संशोधन, आयुर्वेद जीवशास्त्र आणि संगणकीय जीवशास्त्र या क्षेत्रांमध्ये त्यांनी संशोधन केले आहे.

Goa News: आयआयटी आणि एनआयटी- गोवाशी संबंधित असलेले वरदकांत मिश्रा, अभिषेक गुप्ता, सुबुधी विद्याधर, धीरेंद्र बहादूर आणि दामोदर रेड्डी यांचाही शास्त्रज्ञांच्या या यादीत समावेश आहे. मात्र डॉ. शैलेंद्र गुरव हे गोवा विद्यापीठाशी संबंधित असलेले एकमेव शास्त्रज्ञ या यादीत समाविष्ट आहेत.
Goa University: गोमंतकीयांना मिळणार ‘इस्त्रो’मध्ये संधी! विद्यापीठात सुरु होणार खास अभ्यासक्रम; कुलगुरूंनी दिली माहिती

सध्या डॉ. गुरव हे गोवा वि‌द्यापीठाच्या फार्मसी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आणि सावित्रीबाई फुले वि‌द्यापीठ, महाराष्ट्र येथील फार्माकोग्नोसी अभ्यास मंडळाचे सदस्य आहेत. 'अमेरिकन हर्बल फार्माकोपिया' चे सल्लागार, एपीटीआय-गोवा राज्याचे उपाध्यक्ष आणि 'फार्मास्युटिकल सायंटिस्ट्स अँड एज्युकेटर्स असोसिएशन' (एपीएसई) चे संयुक्त सचिव, 'जर्नल ऑफ आयुर्वेद अँड इंटिग्रेटिव्ह मेडिसिन' (एल्मेव्हियर)चे सहयोगी संपादक, 'करंट इंडियन सायन्स' (बैथम), 'फ्रंटियर्स इन फार्माकोलॉजी', 'प्लॉस कम्प्युटेशनल बायोलॉजी' चे अतिथी संपादक, संपाद‌कीय मंडळ सदस्य आणि अनेक आंतरराष्ट्रीय जर्नल्सचे समीक्षक अशी महत्वाची पदे ते सध्या भूषवत आहेत.

मलेशियाच्या आयएनटीआय आंतरराष्ट्रीय वि‌द्यापीठाचे 'आंतरराष्ट्रीय संशोधन फैलो' म्हणून डॉ. गुरव यांना यापूर्वी सन्मानित करण्यात आले आहे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेची वरिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती, यूजीसी- नवी दिल्लीची कनिष्ठ संशोधन शिष्यवृत्ती त्यांना प्राप्त झाली आहे.

'डॉ.पी डी पाटील राष्ट्रीय पुरस्कार,' 'फार्मास्युटिकल सायन्सेस' (नैसर्गिक उत्पादने श्रेणी-2023) मध्ये 'सर्वोत्तम प्रबंध' आणि देवांग मेह‌ता नॅशनल एज्युकेशन फाउंडेशन' (२०१९) ‌द्वारे फार्माकोग्नोसी विषयामधील सर्वोत्तम प्राध्यापक' म्हणून सन्मानित करण्यात आले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com