CM डॉ. प्रमोद सावंत यांची गणपतीपुळे येथे श्रींचरणी सेवा; भाजपच्या विजयासाठी केली प्रार्थना

CM Pramod Sawant: मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने प्रयत्न करत आहे.
Pramod Sawant
Pramod Sawant Dainik Gomantak

CM Pramod Sawant: गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांनी रत्नागिरीतील श्री क्षेत्र गणपतीपुळे येथे श्रींचे मंदिरात पूजा केली.

यावेळी भाजपा युवा मोर्चा दक्षिण रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष, मुख्य पुजारी अभिजीत घनवटकर आणि मुख्य पुजारी व डॉ चैतन्य घनवटकर यांनी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामध्ये मोदी सरकार येऊ दे, भारत महासत्ता होऊदे, महाराष्ट्र, गोवा त्याचप्रमाणे पूर्ण भारत देशातील जनता सुखी समाधानी होऊदे यासाठी श्रींच्या चरणी प्रार्थना केली.

श्रींची पूजा, अभिषेक कार्यक्रम झाल्यानंतर दिवार लेखन अभियान- कार्यक्रम सुद्धा पार पडला. त्यावेळी उत्तर रत्नागिरी तालुका अध्यक्ष विवेक सुर्वे रत्नागिरी विधान सभा क्षेत्र प्रमुख बाळासाहेब माने सुद्धा उपस्थित होते.

सध्या सर्वत्र लोक सभा निवडणुकीचे वेध सुरु झाले असून गोव्यात यंदाही सावंत सरकार सत्तेत येणार का यावर सर्वसामान्यांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहेत.

मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी प्रत्येक पक्ष आपापल्यापरीने प्रयत्न करत असून मतदारसंघात मंत्र्यांच्या भेटीगाठींचे प्रमाण वाढले आहे.

Pramod Sawant
Sudin Dhavalikar: माझ्या संस्कृतीत अपशब्द नाहीत! मात्र आता लोकांनी आरजीवाल्यांपासून सावध राहण्याची गरज- ढवळीकर

जनतेच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षांचा जाहीरनामा तथा संकल्पपत्रात समावेश करण्याकरिता जनतेच्या सूचना रथयात्रेच्या माध्यमातून संकलित करत मतदार राखण्यासाठी भाजपचे नवे मिशन आरंभले असून मुख्यमंत्र्यांसह भाजपचे नेते या मोहिमेत सहभागी झाल्याचे दिसून येतेय.

साखळी नगरपालिका क्षेत्रातील विकासकामे गती धरू लागली असून येणाऱ्या काळात साखळीचा कायापालट पहायला मिळेल.

प्रथमच नगरपालिकेत पूर्ण बहुमताने आमच्या पक्षाला सत्ता दिल्याने सर्व कामांना गती मिळत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी साखळी येथे केलेय.

साखळी नगरपालिका क्षेत्रात सुमारे 10 कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आलाय. यासर्व कार्यक्रमातून भाजपाला सत्ता राखण्यासाठी मोठी मदत मिळेल असे चित्र निर्माण झाले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com