CM Pramod Sawant: गोवा लवकरच ‘लॉजिस्टिक हब’

CM Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांची घोषणा: केंद्र सरकारतर्फे आणखी दहा हजार कोटी मंजूर
CM Pramod Sawant
CM Pramod Sawant Dainik Gomantak

CM Pramod Sawant: गोव्याचा आनंद निर्देशांक सर्वांपेक्षा वरचढ असल्याने राजनीती, सामाजिक कार्य व सेवा तसेच व्यापारामध्ये येथे सदैव सकारात्मक मानसिकता दिसत असते.

इतर राज्यांपेक्षा गोवा वरचढ असून ‘हर घर जल’, शिक्षण, ‘हर घर बिजली’ या योजना सफल होत असतानाच ‘हर घर फायबर’ ही योजनासुद्धा जास्तीत जास्त गोमंतकीयांपर्यंत पोहोचवू असे सांगून गोवा लवकरच ‘लॉजिस्टिक हब’ बनणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली.

पांचजन्य सागर मंथन कार्यक्रमाचा समारोप डॉ. सावंत यांच्या मुलाखतीने झाली. त्यांची मुलाखत पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांनी घेतली त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली.

केंद्र सरकारने यापूर्वीच गोव्यात २५ हजार कोटी रुपयांचे जास्तीत जास्त प्रकल्प पूर्ण केले असून काही प्रकल्प पूर्णत्वाच्या वाटेवर आहेत. केंद्र सरकारने रस्त्यांच्या विस्तारीकरण व अपघात क्षेत्राची सुधारणा करण्यासाठी आणखी १० हजार कोटी रुपये मंजूर केले आहेत.

शिवाय पर्वरी येथील उड्डाण पुलासाठी ६५० कोटी रुपये मंजूर केले आहेत. आता विमानतळ तसेच रेल्वे स्थानकांपासूनच्या रस्त्यांची दुरुस्ती हाती घेतली जाईल.

मोपा विमानतळावरून निर्यात करण्याची व्यवस्था सुरू केली जाईल, असे डॉ. सावंत यांनी सांगितले. आपले सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर मंत्र व राज्य सरकारच्या स्वयंपूर्ण गोवा या तत्त्वावर गोव्याची आगेकूच सुरू आहे.

कॉंग्रेससह इतर पक्ष गोव्याकडे केवळ व्यवसायाच्या दृष्टिकोनातून पाहतात. गोव्याचा वापर त्यांनी एटीएमप्रमाणे केला व करीत असल्याचे डॉ. सावंत यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Sanquelim News : साखळीत केबलिंगचे काम रोखले; नगरसेवक संतप्त

गोव्याला स्वयंपूर्ण मित्रापासून लाभ झाला आहे. केंद्र व राज्य सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचविण्याचे ते काम करतात.

गोव्याला दिवसाला ३.२५ लाख लीटर दुधाची आवश्यकता असते. मात्र, गोव्यात केवळ ६० हजार लीटर दूध तयार होते.

तसेच गोव्यात भाजी, फुले यासाठी इतर राज्यांवर अवलंबून रहावे लागत होते, पण आता गोव्यात कृषी, दूध, भाज्या व फुलांचे उत्पादन ३० ते ४० टक्क्यांनी वाढले आहे, असे त्यांनी सांगितले.

CM Pramod Sawant
Union Ministry of Sports: कुस्ती महासंघ अखेर ‘चितपट’

दाबोळी विमानतळ बंद होणार नाही

मोपा विमानतळासाठी जागा संपादन करण्यास सुरवात झाल्यापासूनच दक्षिण गोव्यातून दाभोळी विमानतळ बंद होणार असे बोलले जात होते. त्यांच्या मनात तसा भ्रम निर्माण करण्यात आला होता.

नागरी विमान वाहतूकमंत्री तसेच संरक्षणमंत्र्यांनीसुद्धा यापूर्वी दाभोळी विमानतळ कोणत्याही स्थितीत बंद होणार नाही असे जाहीर केले आहे.

हल्लीच केंद्र सरकारने ३०० कोटी रुपये खर्च करून विमानतळाची साधनसुविधा वाढविली आहे. या विमानतळावरून उड्डाणे रद्द करण्यात आलेली नाहीत, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

आयआयटीला लवकरच जागा

गोव्यात सर्वप्रकारच्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. कुंकळ्ळी येथील एनआयआयटी कॅम्पस पूर्ण झाला आहे.

आयआयटी प्रकल्प लोकांच्या विरोधामुळे गेली चार वर्षे रखडला आहे, पण आता रिवण येथे १० लाख चौरस मीटर जागा संपादन करून पुढील वर्षी ती आयआयटीकडे सुपूर्द केली जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com