राष्ट्र उभारणीसाठी आपली बांधिलकी बळकट करू या...डॉ. प्रमोद सावंत

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते आज गोव्यात ध्वजारोहन करण्यात आले.
Goa CM Dr Pramod Sawant wished people happy Republic Day
Goa CM Dr Pramod Sawant wished people happy Republic DayDainik Gomantak

आज संपुर्ण देशभर प्रजासत्ताक दिन (Republic Day) मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. विविधतेचे वैशिष्ट्य असलेल्या भारत (India) देशातील राज्यांमध्येही आज मोठा उत्साह दिसून येत आहे. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत (CM Pramod Sawant) यांनी गोवेकरांना आज प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छी देत "या महान राष्ट्राचे अभिमानी नागरिक या नात्याने आपण आपला वारसा, नैतिकता समृद्धीचे जतन करूया आणि राष्ट्र उभारणीसाठी आपली बांधिलकी बळकट करू या," असे आवाहन केले आहे.

गोव्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांच्या हस्ते आज गोव्यात ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी त्यांनी गोवेकरांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत संबोधित केले. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत उपस्थित होते. गोव्यात निवडणूकीची परिस्थिती लक्षात घेत त्यांना नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन केले. " वर्षभरात गोव्यातील सर्व गावे आणि लोकांपर्यंत पोहोचण्याचे आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या समजून घेण्याचे ध्येय स्वयंपूर्णा गोवा यात्रा अंतर्गत ठरवण्यात आले आहे; गोव्यात विधानसभा निवडणुका होत आहेत आणि मी लोकांना आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने मतदान करावे. कोविड -19 लसीकरणामुळे आम्हाला आर्थिक क्रियाकलाप पुन्हा रुळावर आणण्यास मदत झाली आहे, असे मत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी प्रजासत्ताक दिनाच्या भाषणादरम्यान व्यक्त केले.

Goa CM Dr Pramod Sawant wished people happy Republic Day
क्रीडा आणि अध्यात्माच्या स्वरूपात गोव्यात दोन पद्मश्री पुरस्कार जाहीर

"स्वतंत्र मतदानाचा अधिकार हा लोकशाहीचा पाया आहे आणि देशातील मतदारांनी विरोधी पक्षांना महत्त्वाची भूमिका बजावण्याची संधी दिली आहे. मत व्यक्त करण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आधार आहे,"असेही मत त्यांनी मतदारदिनी व्यक्त केले. गोव्यातील काम्पाल या ठिकाणी प्रजासत्ताक दिनानिमित्त परेडचे आयोजन करण्यात आले आहे. या परेडला राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई आदी उपस्थित आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com