Goa News: अध्यात्मातून मिळते मानसिक सुखशांती- श्रीधरन पिल्लई

Goa News: राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी बेतोड्यातील पारवडेश्‍वर महाराज मठाला भेट दिली.
Goa News | Governor Sreedharan Pillai
Goa News | Governor Sreedharan PillaiDainik Gomantak

Goa News: बेतोड्यातील सद्‍गुरू पारवडेश्‍वर महाराज मठाला काल गोव्याचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी भेट दिली. मठाचे अधिपती सद्‍गुरू भाऊ महाराज यांनी स्वागत केले. यावेळी शिरोडा मतदारसंघाचे आमदार तथा राज्याचे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर, बेतोडा मठाचे सोहमराजे तसेच मठाचे अन्य अनुयायी व इतर मान्यवर उपस्थित होते.

राज्यपाल श्रीधरन पिल्लई (Goa Governor Shreedharan Pillai) यांनी मठाला भेट देऊन पारवडेश्‍वर महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले. मठ परिसरातील प्रसन्न वातावरणामुळे राज्यपालांनी आनंद व्यक्त करून अशाप्रकारे अध्यात्मातून मानसिक सुखशांती मिळते, असे नमूद केले. पारवडेश्‍वर मठाचे अधिपती सद्‍गुरू भाऊ महाराज यांच्या कार्याबद्दल त्यांनी शुभेच्छा दिल्या.

राज्यपालांना सद्‍गुरू पारवडेश्‍वर महाराजांचे कार्य तसेच त्यांना देण्यात आलेला जागतिक शांतीसाठीचा व इतर पुरस्काराबद्दल अवगत करण्यात आले.

Goa News | Governor Sreedharan Pillai
Goa BJP: मडगावात भाजपचे पुन्हा मताधिक्य वाढणार!

सद्‍गुरु भाऊ महाराज यांनी आशीर्वचनात पारवडेश्‍वर महाराज मठाद्वारे व्यसनमुक्ती तसेच जागतिक शांती प्रस्थापित करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे आज अनेक कुटुंबे विभक्त होण्यापासून बचावली असल्याचे सांगून मुलांना आईवडिलांचे महत्त्व कळावे यासाठी आयोजिण्यात आलेल्या दांपत्य जीवनावरील आईवडिलांचे पूजन या उपक्रमासंबंधी माहिती दिली.

राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांचा सद्‍गुरू भाऊ महाराज यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व भेटवस्तू देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर राज्यपालांनी पारवडेश्‍वर मठाच्या अनुयायींना शुभेच्छा दिल्या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com